Movie on Tata Family: देशातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा कुटुंबावर सिनेमा बनणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित कुटुंबाची कथा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी टी-सीरीज (भूषण कुमार) आणि ऑलमाईटी मोशन पिक्चर्स एकत्र आले आहेत.
टाटा कुटुंबावर बनवल्या जाणाऱ्या या चित्रपटात कुटुंबाच्या 200 वर्षांच्या इतिहासाची माहिती दिली जाणार आहे. या चित्रपटाची घोषणा करताना माहिती देण्यात आली की, 'तीन पिढ्यांपासून राष्ट्र उभारणीत सहभागी झालेल्या दिग्गज उद्योगपती टाटा कुटुंबाच्या कथेचे एव्ही हक्क मिळविल्याचा आम्हाला अभिमान आहे.'
अधिक वाचा : प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराजांची प्रकृती बिघडली
चित्रपटाची कथा ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर यांच्या 'द टाटास: हाऊ अ फॅमिली बिल्ट अ बिझनेस अँड अ नेशन' या पुस्तकावर आधारित असेल. कंपनीने काही काळापूर्वी या पुस्तकाचे हक्क विकत घेतले होते. मात्र, या चित्रपटाचं शूटिंग कधी आणि कुठे सुरू होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच या चित्रपटाच्या रिलीजची तारीख आणि स्टारकास्ट याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अधिक वाचा : राज्यसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवार जाहीर
चित्रपटाची कथा गिरीश कुबेर यांच्या पुस्तकातून घेतली जाणार असून केवळ रतन टाटा यांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. टाटा कुटुंबाने केवळ व्यवसायच उभारला नाही तर राष्ट्रनिर्मितीतही योगदान दिले आहे, अशी माहिती आहे.