Suspense thriller: सस्पेन्स थ्रिलर '420 IPC'चा प्रीमियर 17 डिसेंबरला ZEE5वर

Suspense thriller: ZEE5 चा आगामी '420 IPC'चित्रपट येत्या 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.. सोमवारी ZEE5 ने याची घोषणा केली. हा एक सस्पेन्स थ्रीलर सिनेमा आहे...

The suspense thriller '420 IPC' premiered on ZEE5 on 17 December
'420 IPC'चा प्रीमीयर ZEE5वर होणार....  
थोडं पण कामाचं
  • ZEE5वर होणार '420 IPC'चा प्रीमीयर
  • '420 IPC'सस्पेन्स थ्रीलर फिल्म
  • विनय पाठक, रणवीर शौरी, गुल पनाग प्रमूख भूमिकेत

Suspense thriller: ZEE5 चा आगामी '420 IPC'चित्रपट येत्या 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे..सोमवारी ZEE5 ने याची घोषणा केली. हा एक सस्पेन्स थ्रीलर (Suspense thriller)   सिनेमा आहे. सेक्शन 375 चे संवाद लिहिणारे मनीष गुप्ता या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. या सिनेमात विनय पाठक, रणवीर शौरी, गुल पनाग आणि रोहन विनोद मेहरा प्रमुख भूमिकेत आहेत. झी स्टुडिओ आणि क्युरियस डिजिटल पी.एल. चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ही कथा आहे एका चार्टर्ड अकाउंटंटची, ज्याला आर्थिक गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे. विनय पाठक चार्टर्ड अकांऊंटंटच्या भूमिकेत आहेत. तर रोहन मेहरा त्यांच्या वकिलांची भूमिका साकारणार आहेत. रणवीर शौरी अनोख्या अशा पारशी सरकारी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर गुल पनाग या चार्टर्ड अकांउंटटच्या पत्नीची भूमिका साकरणार आहे.. 

"420 IPC" ला "रिवेटिंग सस्पेन्स फिल्म" (Suspense thriller) असल्याचं ZEE5 इंडियाचे मुख्य व्यवसाय अधिकारी मनीष कालरा यांनी म्हटलंय. 
“420 IPC हा आर्थिक गुन्ह्याचा समावेश असलेला सस्पेन्स चित्रपट आहे. हा कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांना शेवटच्या फ्रेमपर्यंत खिळवून ठेवेल. तसंच
 मनीष गुप्ता यांच्या सहकार्याने हे पुढे आणताना आम्हाला आनंद होत आहे . ज्यांनी 'सेक्शन 375' च्या यशानंतर आणखी एक आकर्षक स्क्रिप्ट दिली आहे," असंही कालरा म्हणाले.

निर्माते राजेश केजरीवाल आणि गुरपाल सच्चर म्हणाले की ते ZEE5 सारख्या प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यास उत्सुक आहेत.

"आमचा दृष्टीकोन सामग्रीवर आधारित सिनेमा निर्माण करणे आहे;  म्हणून आम्ही झी स्टुडिओसह आमची पहिली सह-निर्मिती म्हणून 420 IPC निवडले कारण ही मनीष गुप्ता यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली पॉवर पॅक्ड स्क्रिप्ट आहे. आम्ही ZEE5 सारख्या स्वदेशी प्लॅटफॉर्मसह भागीदारी करण्यास उत्सुक आहोत जे 190 पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध आहे आणि खात्री आहे की '420 IPC' ला खूप यश मिळेल," असं त्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

आर्थिक गुन्ह्यांच्या यांत्रिकीभोवती विणलेले गुंतागुंतीच्या जाळ्यासारखं कथानक हा चित्रपटाचा मुख्य भाग आहे आणि रहस्य चित्रपटात हळूहळू आणि स्थिरपणे उलगडत जाते,एखाद्या व्यक्तीला शेवटपर्यंत उत्सुक ठेवते. हा चित्रपट व्यापक संशोधनाचा परिणाम आहे, आणि प्रेक्षकांना लवकरच ZEE5 वर त्याचा परिणाम पाहायला मिळेल याचा आनंद होत असल्याचं मत दिग्दर्शक मनीष गुप्ता यांनी मांडलंय...

आता हा सस्पेन्स थ्रीलर  (Suspense thriller) '420 IPC'प्रेक्षकांचं मनोरंजन करणार का याचीच उत्सुकता आहे... 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी