Justin Bieber : व्हायरसमुळे जस्टिन बीबरला झाला धोकादायक आजार, पॅरालिसिसचा परिणाम झाला चेहऱ्यावर,शेअर केला व्हिडिओ

बी टाऊन
Updated Jun 11, 2022 | 15:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Justin Bieber :जस्टिन बीबरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्याचा काही भाग काम करत नसल्याचं जस्टिन बीबरने म्हटले आहे. एका व्हायरसमुळे हा आजार झाल्याचंही जस्टिन बीबरने सांगितले आहे.

The virus caused Justin Bieber a dangerous illness, paralysis of the face, shared video
व्हायरसमुळे जस्टिन बीबरला धोकादायक आजार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पॅरालिसिसचा परिणाम जस्टिनच्या चेहऱ्यावर झालेला आहे.
  • काय आहे Ramsay hunt syndrome?
  • चाहते जस्टिनसाठी प्रार्थना करत आहेत

Justin Bieber : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर सुट्टीवर गेला आहे. सतत कॉन्सर्ट करणाऱ्या जस्टिनने(Justin Bieber)आता शरीराला काही काळ विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.अर्थात त्याचं कारणही तसंच आहे. जस्टिन एका दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे. जस्टिन बीबरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की 
त्याला एक दुर्मिळ आजार झालेला आहे. त्या आजाराचं नाव Ramsay hunt syndrome आहे. त्यामुळे त्याच्या अर्ध्या चेहऱ्यावर अर्धांगवायू झाला आहे (Justin Bieber partial face paralysis)


जस्टिनला चेहऱ्याचा पक्षाघात आहे 

इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करून जस्टिन बीबरने चाहत्यांना सांगितले आहे की तो त्याचा कॉन्सर्ट शो का रद्द करत आहे. व्हिडिओमध्ये जस्टिन सांगत आहे, मला हा आजार एका व्हायरसमुळे झाला आहे, जो माझ्या कामावर आणि चेहऱ्याच्या मज्जातंतूंवर हल्ला करत आहे. यामुळे माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूला पूर्णपणे अर्धांगवायू झाला आहे. तुम्ही पाहू शकता की मी डोळा मिटू शकत नाही. मला एका बाजूने हसूही येत नाही आणि या बाजूने माझे नाक हलत नाही."


जस्टिन बीबरचे काही चाहते त्याचा आगामी शो रद्द झाल्याने नाराज आहेत. त्याला संदेश देताना जस्टिनने सांगितले की, तो सध्या स्टेजवर फिजिकली परफॉर्म करू शकत नाही. 
डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्याने व्हिडिओमध्ये याबद्दल सांगितले 'ही गोष्ट खूप गंभीर आहे, तुम्ही बघू शकता. माझ्या शरीराने मला थोडे शांत होण्यास सांगितले आहे. मला आशा आहे की तुम्ही मला समजून घ्याल, सध्या मला आरामाची गरज आहे. मी 100 टक्के बरा होऊन परत येईन आणि मी जे करण्यासाठी जन्मलो तेच करेन. 

Ramsay Hunt syndrome म्हणजे काय? 

Ramsay Hunt syndrome किंवा RHS हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल रोग आहे. यामध्ये कानाभोवती, चेहऱ्यावर किंवा तोंडावर वेदनादायक पुरळ येतात. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर अर्धांगवायूही होऊ शकतो. यामुळे एखादी व्यक्ती बहिरीसुद्धा होऊ शकते. जेव्हा व्हेरिसेला-झोस्टर विषाणू डोक्याच्या मज्जातंतूंना संक्रमित करतो तेव्हा हा दुर्मिळ रोग होतो. या विषाणूमुळे लहान मुलांमध्ये कांजिण्यादेखील होतात. 


चाहते जस्टिनसाठी प्रार्थना करत आहेत. 

जस्टिनने चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच, तो लवकरच बरा होऊन परत येईल, असे आश्वासन दिले. जस्टिनने सांगितले की, तो डॉक्टरांनी सांगितल्यानुसार चेहऱ्याचा व्यायाम करत आहे जेणेकरून त्याचा चेहरा पुन्हा एकदा सामान्य होऊ शकेल. जस्टिन बीबरचे चाहते आणि हॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊन त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी