Aashram 3 Teaser: बॉबी देओलच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'आश्रम 3' चा टीझर रिलीज झाला आहे. 1 मिनिट 11 सेकंदाच्या टीझरमध्ये बॉबी देओल त्याच्या आश्रमातील लोकांसोबत दिसत आहे. यासोबतच भक्त बाबांच्या नावाने घोषणाबाजी करताना दिसत आहेत. बाबांची भक्ती कशी देशभर पसरली आहे हे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.
या छोट्या टीझरमध्ये जिथे बाबा निराला यांच्या भक्तीत लीन झालेले लोक दाखवले आहेत, तिथे टीझरच्या शेवटी असा संवाद आहे जो संपूर्ण टीझरला एक वेगळी कलाटणी देतो. हा संवाद आहे- 'एक बार आश्रम आया, यू टर्न नहीं होता.'
'आश्रम 3' वेब सीरिजच्या टीझरला सोशल मीडियावर रिलीज होताच जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.जे पाहून हे इतकं स्पष्ट होतंय की चाहते 'आश्रम 3' ची आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांची ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या वेब सीरिजच्या ट्रेलरची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा ट्रेलर 13 मे रोजी रिलीज होणार आहे. मात्र, हा ट्रेलर किती वाजता रिलीज होणार याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.
या वेब सीरिजच्या स्टारकास्टने 'आश्रम 3' चा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करताना, वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या बॉबी देओलने कॅप्शनमध्ये लिहिले - 'आता प्रतीक्षा संपेल, मग आश्रमाचे दरवाजे उघडतील. आश्रम या वेबसीरिजचा सीझन 3 चा ट्रेलर उद्या रिलीज होणार आहे. याशिवाय नव्या सीझनमध्ये दाखल झालेल्या ईशा गुप्तानेही 'आश्रम 3' चा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.