Ranvir Singh Movie 83 : दिल्लीतील थिएटर बंद, कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने निर्णय, 83 सिनेमाचं भवितव्य धोक्यात

बी टाऊन
Updated Dec 29, 2021 | 13:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranvir Singh Movie 83 : कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने दिल्लीतील चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत.त्यामुळे 83 सिनेमाचं भवितव्य धोक्यात आलं आहे.

Theaters in Delhi closed, decision due to increase in corona cases
दिल्लीतील थिएटर बंद, 83 सिनेमाचं भवितव्य धोक्यात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांचा 83 सिनेमाला फटका
  • दिल्लीतील थिएटर बंद, सिनेमांचं भवितव्य धोक्यात
  • शाहिद कपूरच्या जर्सी सिनेमाची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

Ranvir Singh Movie 83 :  मुंबई : रणवीर सिंग स्टारर 83, 24 डिसेंबरला भारतात रिलीज झाला. समीक्षकांनी सिनेमाचं खूप कौतुक केलं. रणवीर सिंगच्या कामाचीही प्रशंसा झाली. कपिल देवच्या भूमिकेत रणवीर सिंगने केलेल्या उत्कृष्ट अभिनयासाठी, चित्रपटाचे बहुतेकांनी कौतुक केले. मात्र, चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर निराशाजनक ओपनिंग केली 

सुरुवातीच्या दिवशी 11.96 कोटी कमाई केली. शनिवार आणि रविवारी वाढ झाली मात्र, म्हणावी तशी उत्साहवर्धक नव्हती. शनिवारी 16 कोटी आणि नेट रविवारी 17 कोटी अशी कमाई केली. हिंदीमध्ये सिनेमाने तब्बल 45 कोटींची कमाई केली. चित्रपटाच्या डब केलेल्या आवृत्त्यांनी  2 कोटी नेट कमाई केली.  एकूण 47 कोटी नेट या सिनेमाने कमावले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)


चित्रपटासाठी सोमवारचे आकडे अतिशय महत्त्वाचे होते. हा चित्रपट केवळ 7 कोटींची कमाई सोमवारी करु शकला. चार दिवसांचे हिंदी नेट प्रॉफिट रु. 52 कोटी होते, तर डब केलेल्या आवृत्त्यांसह  रु. ५४.५ कोटी जवळपास होते. त्यामुळे या सिनेमाला मोठा फटका बसला आहे.

आता तर या सिनेमापुढील अडचणी आणखी वाढणार आहेत, कारण दिल्ली-एनसीआरमध्ये थिएटर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता इतर राज्य काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेसमुळे शाहिद कपूरच्या जर्सी सिनेमाची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)


83 (हिंदी आवृत्ती) चे दिवसानुसार बॉक्स ऑफिस कलेक्शन खालीलप्रमाणे 

दिवस 1 - रु. 11.96 कोटी
दिवस 2 - रु. १६ कोटी
दिवस 3 - रु. १७ कोटी
दिवस 4 - रु.7 करोड
एकूण: रु. ५२ कोटी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी