OTT वर आहेत जबरदस्त दक्षिण चित्रपट; पुष्पासोबत या ५ चित्रपटाने IMDb ने दिलंय सर्वोत्कृष्ट रेटिंग

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jan 11, 2022 | 10:44 IST

'कंटेंट इज किंग' हे Pushpa The Rise या चित्रपटाने (Movies)आपल्या यशातून दाखवून दिले. माउथ पब्लिसिटीपेक्षा प्रसिद्धीचे दुसरे कोणतेच प्रभावी माध्यम नाही. बॉक्स ऑफिसवर (Box office) घबराट निर्माण केल्यानंतर हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर (Amazon Prime Video) प्रदर्शित होत आहे.

There are tremendous Southern movies on OTT
OTT वरील सर्वोत्कृष्ट रेटिंग पाच दक्षिण चित्रपट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दक्षिण सिनेमाचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा: द राइज' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
  • हिंदी आवृत्तीच्या सिनेमाने सुमारे 75 कोटी रुपये कमवले असून लवकरच 100 कोटी रुपयांचा आकडा पार करेल.
  • ओटीटीवरील दक्षिण चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

नवी दिल्ली : 'कंटेंट इज किंग' हे Pushpa The Rise या चित्रपटाने (Movies)आपल्या यशातून दाखवून दिले. माउथ पब्लिसिटीपेक्षा प्रसिद्धीचे दुसरे कोणतेच प्रभावी माध्यम नाही. बॉक्स ऑफिसवर (Box office) घबराट निर्माण केल्यानंतर हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर (Amazon Prime Video) प्रदर्शित होत आहे. जाणून घेऊया साऊथच्या अशाच पाच सर्वोत्तम चित्रपटांबद्दल. दक्षिण सिनेमाचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Superstar Allu Arjun) चित्रपट 'पुष्पा: द राइज' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर स्ट्रीम होत आहे. 

सध्या या चित्रपटाचे तामिळ व्हर्जन स्ट्रीम केले जात आहे. यानंतर तो हिंदी, तेलुगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होईल. 'पुष्पा'ने कोरोनाच्या काळात बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करून इतिहास रचला आहे. त्याच्या हिंदी आवृत्तीची कमाई सर्वात आश्चर्यकारक आहे, कारण चित्रपटाने कोणत्याही ठोस जाहिरातीशिवाय आणि बॉलिवूड स्टारशिवाय अनपेक्षितपणे कामगिरी केली आहे. 

रिलीजच्या 23 व्या दिवशी, चित्रपटाची एकूण कमाई 232 कोटी रुपये झाली आहे, ज्यामध्ये हिंदी आवृत्तीचा हिस्सा सुमारे 75 कोटी रुपये आहे, जो लवकरच 100 कोटी रुपये पार करेल. दरम्यान पुष्पा या चित्रपटाप्रमाणे ओटीटीवर अजून अशा सिनेमे आहेत, ज्यांना IMDb ने जबरदस्त रेटिंग दिली आहे. सध्या लॉकडाऊन चालू आहे, या दिवसांमधील तुमच्या सुट्ट्या हे चित्रपट पाहण्यात घालवा. चला तर जाणून घेऊ कोण-कोणते आहेत सिनेमे. 


1. कुरुप (Kurup)
IMDb रेटिंग- 7.4

श्रीनाथ राजेंद्रानी दिग्दर्शित मल्याळम चित्रपट कुरुप हा हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये डब करून प्रदर्शित झाला आहे. यामध्ये दुल्कर सलमान, शाइन टॉम चाको, शोभिता धुलिपाला, इंद्रजित सुकुमारन, टोविनो थॉमस, माया मेनन आणि विजयकुमार प्रभाकरन यांसारखे दाक्षिणात्य कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.  1984 मध्ये, सुकुमार कुरूप नावाच्या व्यक्तीने विम्याचे पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचे नाटक केले. 

पण ही योजना अंमलात आणण्यासाठी त्याने चाको नावाच्या माणसाची हत्या केली होती. जेणेकरून लोक त्या मृतदेहाला त्याचेच म्हणजे कुरूप समजतील. मात्र केरळ पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले. क्राईम-थ्रिलर चित्रपट 'कुरूप' या कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये दुलकर सलमानने मुख्य भूमिका केली आहे. यामध्ये त्याच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असून Netflix वर या चित्रपटाचा आनंद लुटता येईल.

2. जय भीम (Jai Bhim)
IMDb रेटिंग- 9.4

दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित 'जय भीम'मध्ये साऊथचे सुपरस्टार सुर्या, लिजोमोल जोस, के मणिकंदन, राजीषा विजयन, राव रमेश आणि प्रकाश राज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रा यांच्या प्रसिद्ध खटल्यावर आधारित आहे, जो त्यांनी त्यांच्या वकिलीच्या काळात लढला होता. मात्र, प्रत्यक्षात हे प्रकरण कुरवा जमातीच्या लोकांच्या छळाचे होते. हे कोर्ट नाटक आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या जातिव्यवस्थेचे भीषण वास्तव मांडते.  

चित्रपटाची कथा 1993 च्या एका सत्य घटनेभोवती फिरते, ज्यामध्ये सुर्याने न्यायमूर्ती के चंद्रूची भूमिका साकारली होती. हा चित्रपट पॅन इंडिया स्तरावर तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट Amazon Prime Video वर पाहता येईल.

3. मिन्नल मुरली (Minnal Murali)
IMDb रेटिंग- 8.3

देसी सुपरहिरो चित्रपट 'मिनाल मुरली' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम होत आहे. मॉलीवूड म्हणजेच मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचा हा चित्रपट बेसिल जोसेफ यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यामध्ये टोविनो थॉमस, गुरु सोमसुंदरम, फेमिना जॉर्ज, अजू वर्गीस, शेली किशोर, बैजू संतोष आणि हरिश्री अशोकन यांसारखे कलाकार आहेत. या चित्रपटाची निर्मिती सोफिया पॉल यांनी केली आहे, तर कथा आणि पटकथा अरुण अनिरुधन आणि जस्टिन मॅथ्यू यांनी लिहिली आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि लेखन टीमचे कौतुक करावे लागेल, ज्यांनी दैवी शक्ती असलेला 'मिनल मुरली'सारखा सुपरहिरो तयार केला आहे, पण तो प्रत्येक दृश्यात सामान्य माणसासारखा दिसतो. चित्रपटातील खलनायक गर्जना करत नाही, गोळ्या झाडत नाही, तो एक सामान्य मजूर आहे, जो लहानपणी प्रेम मिळवण्यासाठी मध्यमवयातही त्रास सहन करतो. 'मिनल मुरली' चित्रपटाची कथा केरळमधील एका गावात राहणारा टेलर जेसन (टोविनो थॉमस) आणि मजूर शिबू (गुरू सोमसुंदरम) यांच्याभोवती फिरते. दोघांनाही नंतर सुपर पॉवर मिळते, पण दोघेही त्यांचा स्वतंत्रपणे वापर करतात. हा देसी सुपरहिरो आणि सुपरव्हिलनचा जन्म होतो.

4. मास्टर (Master)
IMDb रेटिंग- 7.8

दिग्दर्शक लोकेश कांगराज दिग्दर्शित 'मास्टर' चित्रपटात मालविका मोहनन, शंतनू भाग्यराज, अर्जुन दास, आंद्रिया आणि नस्सर यांच्यासह दक्षिण चित्रपटसृष्टीतील दोन मोठे सुपरस्टार विजय आणि विजय सेतुपती आहेत. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट एका मद्यपी प्राध्यापकाच्या जीवनाभोवती फिरतो, ज्याला तीन महिन्यांसाठी बालसुधारगृहात पाठवले जाते. तिथे त्याला एक क्रूर गुंड भेटतो जो आपल्या गुन्हेगारी कारवायांसाठी निष्पाप मुलांना बळीचा बकरा बनवतो. हा चित्रपट पॅन इंडिया स्तरावर हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला.

यामध्ये सुपरस्टार विजयच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली. त्यांचे यापूर्वीचे 'मर्सल', 'सरकार' आणि 'बिगिल' हे चित्रपट जगभर पाहायला मिळाले.  विजय बॉक्स ऑफिसचा 'मास्टर' मानला जातो. मास्टर प्रथम थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने 223 कोटींचे कलेक्शन केले होते. हे अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

5. फिल्म- कर्णन
IMDb रेटिंग- 8.2

'कर्णन' चित्रपटाचे दिग्दर्शन तमिळ दिग्दर्शक मारी सेल्वाराज यांनी केले आहे. यामध्ये धनुष, लाल पॉल, योगी बाबू, नटराजन सुब्रमण्यम, राजिषा विजयन, गौरी जी किशन आणि लक्ष्मी प्रिया चंद्रमौली हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.  कर्णन हा केवळ चित्रपट नाही. ही एक चळवळ आहे. सर्व माणसे समान जन्माला येतात असे मानणाऱ्यांसाठी एक वेक अप कॉल आहे.

 आपल्या समाजात आजही जातिव्यवस्था विविध स्वरूपात अस्तित्वात आहे. असमानता आपल्या डीएनएमध्ये आहे. मारी सेल्वाराज यांचा धर्म आणि जातीवर आधारित व्यवस्थेविरुद्धचा राग चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेमवर छापलेला पाहायला मिळतो. कथेच्या मध्यभागी एक गाव आहे, जिथे समाजातील खालच्या जातीतील, उपेक्षित, वंचित आणि बहिष्कृत लोक राहतात. चित्रपट केवळ मनोरंजनच करत नाही तर एक मजबूत सामाजिक संदेशही देतो. हे प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी