South 10 Movie : साऊथच्या या 10 चित्रपटांनी बॉलीवूडच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

South 10 Movie On box office :बॉलिवूडवर साउथ सिनेसृष्टी हळूहळू पाय पसरत आहे. अनेक सिनेमा बॉलिवूडमध्येही रिलीज होत आहेत. याचे कारण म्हणजे साऊथ सिनेमांकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे. पाहुया कोणत्या 10 सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

These 10 films from the South made a splash at the Bollywood box office.
साऊथच्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर धमाका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • साऊथचे हे 10 चित्रपट बॉलिवूडवर भारी
 • बॉक्स ऑफिसवर साऊथच्या सिनेमांची चांगली कमाई
 • बॉलिवूडच्या निर्मात्यांना टफ फाईट

South Movie Box Office Collection : नुकत्याच रिलीज झालेल्या अल्लू अर्जुन - रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट पुष्पाने बॉक्स ऑफिसवर एकच धमाका केला आहे. ही यादी बॉलिवूड निर्मात्यांनाही टफ फाईट देणारी आहे. या साऊथ चित्रपटांनी देशभरातून अनेक कोटी कमावले आहेत. 

साऊथच्या या 10 चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला

Baahubali 2: The Conclusion TV premiere: 'Baahubali 2: The Conclusion' to have television premiere on this weekend! - Times of India

1 बाहुबली: (Baahubali: The Conclusion)


2017 मध्ये रिलीज झालेला दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा बाहुबली चित्रपट या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. प्रभास आणि अनुष्का शेट्टी स्टारर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 1351 कोटींची कमाई केली. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय चित्रपट आहे.

 

2.0' box office collection day 13: The Rajinikanth and Akshay Kumar starrer collects Rs 3 crore on Tuesday | Hindi Movie News - Times of India
2. २.०

रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर चित्रपट २.० या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. शंकर दिग्दर्शित हा सिनेमा 2018 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाने देशातील सिनेमागृहांमधून एकूण 507.50 कोटी रुपयांची कमाई केली.

bahubali: Baahubali: The Beginning to be screened at Royal Albert Hall next year | Telugu Movie News - Times of India
3. बाहुबली: (Baahubali: The Beginning)

2015 साली रिलीज झालेल्या दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या बाहुबली या चित्रपटाच्या पहिल्या भागालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. प्रभास आणि अनुष्का शेट्टी स्टारर चित्रपटाने  482 कोटी रुपये कमवले होते.

Release date of Prabhas and Shraddha Kapoor starrer 'Saaho' postponed | Hindi Movie News - Times of India

4. साहो (Saaho)


या यादीतील सुपरस्टार प्रभासचा हा तिसरा चित्रपट आहे. 2019 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 339 कोटी रुपयांची कमाई केली.

Rumours about change in Ala Vaikunthapurramuloo release date | Telugu Movie News - Times of India

5. अला वैंकुठपुरमलो (Ala Vaikunthapurramuloo)

अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे स्टारर दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या चित्रपटाने देशभरातून एकूण 226.70 कोटी रुपये कमवले.

 

Makers of 'Pushpa: The Rise' put out trailer tease | Telugu Movie News - Times of India
6. पुष्पा (Pushpa: The Rise)


अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर दिग्दर्शक सुकुमार यांचा नुकताच रिलीज झालेला पुष्पाने छप्पर फाड कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने  एकूण 223 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच अल्लू अर्जुनचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो.

KGF: Chapter 1' to be re-released on the occasion of Kannada Rajyotsava | Kannada Movie News - Times of India


7. केजीएफ (KGF: Chapter 1)


कन्नड सुपरस्टार यशच्या KGF चित्रपटाने देखील सिल्व्हर स्क्रीनवर बंपर कमाई करून संपूर्ण भारतातून एकूण 221.50 कोटी रुपये कमवले.

Filmmaker Shankar lands into legal trouble as court issues non-bailable warrant against him in Rajinikanth-Aishwarya Rai starrer 'Enthiran' story theft case | Hindi Movie News - Bollywood - Times of India


8. एथिरन (Endhiran)

ऐश्वर्या राय बच्चन आणि रजनीकांत स्टारर रोबोटने देशभरातून एकूण 218 कोटींचा गल्ला जमवला होता. हा चित्रपट तमिळ भाषेत इथिरन नावाने रिलीज झाला.

Official statement on Thalapathy Vijay's Master release | Tamil Movie News - Times of India

9. मास्टर (Master)

थलपथी विजय आणि विजय सेतुपती स्टारर दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्या मास्टर चित्रपटाने संपूर्ण भारतातून एकूण 209.50 कोटी रुपयांची कमाई केली.

Vijay's Bigil audio launched | Tamil Movie News - Times of India

10. बिगिल (Bigil)

थलपथी विजय स्टारर चित्रपट बिगिल या यादीत 10 व्या स्थानावर आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 209 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट पॅन इंडियाच्या पातळीवर प्रदर्शित रिलीज झालेला नाही. चित्रपटाने ही रक्कम फक्त तामिळ भाषेत जमा केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी