Celebrity charges for OTT film and Webseries : ओटीटीने अनेक सेलिब्रिटींच्या करिअरला नवी उंची दिली आहे. तर दुसरीकडे प्रेक्षकांनाही कंटेंटमध्ये वैविध्य पाहायला मिळत आहे. ओटीटीवर चित्रपटांसोबतच वेब सीरिजही पाहायला मिळतात. या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला निवडक 11 सेलेब्सच्या OTT फीबद्दल सांगत आहोत. आमच्या यादीत राधिका आपटे ते समंथा यांचा समावेश आहे.
जितेंद्र कुमार: सध्या जितेंद्र कुमार पंचायत 2मुळे खूप चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,त्याला एका एपिसोडसाठी चार लाख रुपये फी मिळाली आहे. यापूर्वी, त्याने कोटा फॅक्टरीसह अनेक टीव्हीएफ शोमध्ये आपली कमाल दाखवली आहे. त्याचबरोबर तो आयुष्मान खुरानासोबत 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातही दिसला आहे.
पंकज त्रिपाठी : अनेक वेबसीरिज आणि चित्रपटांमध्ये आपली ताकद दाखवणारा अभिनेता पंकज त्रिपाठीचाही या यादीत समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याला सेक्रेड गेम्ससाठी 12 कोटी रुपये आणि मिर्झापूरसाठी 10 कोटी रुपये पहिल्या सीझनसाठी मिळाले होते.
मनोज वाजपेयी: मनोज वाजपेयीने अनेक ओटीटी चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही सशक्त अभिनय केलेला आहे. 'द फॅमिली मॅन'च्या दुसऱ्या सीझनसाठी त्याला 10 कोटी रुपये फी मिळाल्याचं म्हटलं जात आहे.
बॉबी देओल: आजकाल अभिनेता बॉबी देओल आश्रम 3 साठी खूप प्रशंसा मिळवत आहे. या वेबसीरिजसाठी त्याला जवळपास 5 कोटी रुपये मानधन मिळाल्याचे बोलले जात आहे.
प्रतीक गांधी: 1992 स्कॅम या वेबसीरिजमुळे लोकांच्या नजरेत आलेला अभिनेता प्रतीक गांधी. प्रतीक गांधी याला एका एपिसोडसाठी 5 कोटी रुपये आकारण्यात आले होते.
प्रियामणी: तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर, प्रियामणी मनोज वाजपेयीसोबत द फॅमिली मॅन या वेब सीरिजमध्ये दिसली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिला एका एपिसोडसाठी 10 लाख रुपये फी मिळाली होती.
नवाजुद्दीन सिद्दीकी: ओटीटीवर आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हिट लिस्टमध्ये रात आलेली है, सेक्रेड गेम्सचा समावेश आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो एका सीझनसाठी 10 कोटी रुपये घेतो.
राधिका आपटे: सेक्रेड गेम्स, गुल आणि रात अकेली है यांसारख्या वेबसीरिजने सर्वांची मने जिंकणाऱ्या राधिका आपटेचेही नाव या यादीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका आपटेला सेक्रेड गेम्ससाठी 4 कोटी रुपये फी मिळाली होती.
समंथा रुथ प्रभू: समंथा रुथ प्रभूने द फॅमिली मॅन 2 मधील तिच्या दमदार अभिनयासाठी सर्वांकडून खूप टाळ्या मिळवल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा रुथ प्रभूला एका एपिसोडसाठी 8 लाख रुपये मिळाले होते.
सुनील ग्रोव्हर: सनफ्लॉवर आणि तांडव यांसारख्या मालिकांमध्ये दिसणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर एका एपिसोडसाठी सुमारे 5 लाख रुपये मानधन घेतो.
सैफ अली खान : सैफ अली खाननेही ओटीटीवर धुराळा उडवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानला सेक्रेड गेम्ससाठी 15 कोटी रुपये फी मिळाली होती.