Irrfan Khan Death Anniversary: या 15 संवादांनी इरफान खानला बनवले चित्रपटसृष्टीतील जादूगार

बी टाऊन
Updated Apr 29, 2021 | 12:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

अभिनेता इरफान खानच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने त्याचे चाहते त्याच्या छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप्स शेअर करून त्याला श्रद्धांजली देत आहेत. हे आहेत इरफानच्या चित्रपटांतले प्रसिद्ध संवाद.

Irrfan Khan
या 15 संवादांनी इरफान खानला बनवले चित्रपटसृष्टीतील जादूगार  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • एका वर्षापूर्वी इरफान खानचे झाले होते निधन
  • न्यूरोएंडोक्राईन ट्यूमरमुळे झाले होते निधन
  • जाणून घ्या इरफानच्या चित्रपटातले गाजलेले संवाद

नवी दिल्ली: बॉलिवूडमधला (Bollywood) दिवंगत अभिनेता (actor) इरफान खान (Irrfan Khan) आपल्या खुमासदार शैली (style) आणि उत्तम अभिनयासाठी (acting) ओळखला जातो. पण त्याने या जगाचा निरोप घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि त्याच्या अभिनयाची जादू अद्याप सिनेसृष्टीवर (film industry) कायम आहे. 29 एप्रिल 2020 रोजी न्यूरोएंडोक्राईन ट्यूमरमुळे (neuroendocrine tumor) त्याचे निधन झाले होते. वयाच्या अवघ्या 54व्या वर्षी त्याचे या दीर्घ आजारामुळे निधन झाले. इरफान खानच्या अकाली निधनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने त्याचे चाहते (fans) त्याच्या छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप्स (video clips) शेअर (share) करून त्याला श्रद्धांजली (tribute) देत आहेत. जाणून घेऊया इरफानच्या चित्रपटांतले (films) प्रसिद्ध संवाद (famous dialogues).

पान सिंह तोमर

2015मध्ये प्रदर्शित झालेल्या पान सिंह तोमर या चित्रपटातील ‘बीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लिमेंट में’ हा संवाद चाहत्यांच्या खूप पसंतीला पडला होता. या चित्रपटात इरफानने एका सैनिकाची भूमिका साकारली होती. जो सेवानिवृत्त झाल्यावर शस्त्र उचलतो.

गुंडे

रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात इरफानने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. यातील त्याचा संवाद ‘पिस्तौल की गोली और लौंडिया की बोली जब चलती है, तो जान दोनों में ही खतरे हैं होती है।’ खूप गाजला होता.

हिन्दी मीडियम

‘एक फ्रांस बंदा, जर्मन बंदा स्पीक रॉन्ग इंग्लिश, वी नो प्रॉब्लम, एक इंडियन बंद ये रॉन्ग इंग्लिश, बंदा ही बेकार हो जाता है जी।’ हा, हिंदी मीडियम या चित्रपटातील संवाद अनेक लोकांना प्रेरणा देऊन जातो.

मदारी

यंत्रणा आणि सरकारचा पर्दाफाश करणाऱ्या या चित्रपटातील इरफानच्या अभिनयाचे भरभरून कौतुक झाले. यातील ‘तुम मेरी दुनिया छीनोगें, मैं तुम्हारी दुनिया में घुस जाऊंगा।’ हा संवाद अद्याप लोकांच्या ओठांवर आहे.

ये साली जिंदगी

दिवंगत अभिनेता इरफान खानच्या या चित्रपटातील ‘..आशिकी के चक्कर में मर गया और लौंडिया भी नहीं मिली।’ या संवादाला लोकांनी, खासकरून युवा वर्गाने खूप डोक्यावर घेतले होते.

तलवार

बहुचर्चित तलवार मर्डर केसवर आधारित या चित्रपटातील ‘किसी भी बेगुनाह को सजा मिलने से अच्छा है दस गुनहगार छूट जाए।’ हा संवाद त्यावेळी अनेक बातम्यांचा विषय ठरला होता.

हासिल

2003मध्ये विद्यार्थ्यांच्या राजकारणावर बनलेल्या हासिल या चित्रपटातील संवादही राजकीय वर्तुळात बरेच गाजले आणि आजही विद्यार्थी निवडणुकांमध्ये ते ऐकू येतात. त्यात इरफानच्या तोंडी असलेला ‘और जान से मान देना बेटा, हम रह गए ना मारने में देर नहीं लगाएंगें, भगवान कसम।’ हा संवाद गाजला होता आणि इरफानला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

हैदर

शाहिद कपूरच्या हैदर या चित्रपटात इरफान खानचा ‘आप जिस्म हैं तो मैं रूह, आप फानी में लफानी’ हा संवाद लोकप्रिय ठरला होता.

लाइफ इन मेट्रो

‘ये शहर हमें जितना देता है, बदेल में कहीं ज्यादा हमसे ले लेता है।’

पीकू

अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोणसह इरफान खानची महत्वाची भूमिका असलेल्या या चित्रपटातला इरफानचा ‘डेथ और शिट, किसी को, कहीं भी, कभी भी आ सकती है।’ हा विनोदाची किनार असलेला संवाद गाजला होता.

द लंच बॉक्स

‘आई थिंक वी फॉरगेट थिंग्स इफ देयर इज नो बडी टू टेल देम।’

द किलर

‘बडे शहरों की हवा और छोटे शहरों का पानी, बड़ा खतरनाक होता है।’ हा इरफानच्या तोंडी असलेला संवाद लोकांच्या तोंडून अनेकदा ऐकू येतो.

डी-डे

डी-डे या चित्रपटातील ‘गलतियां भी रिश्तों की तरह होती हैं, करनी नहीं पड़ती हो जाती हैं।’ हा संवाद प्रेमी युगुलांमध्ये आजही खूप लोकप्रिय आहे.

मदारी

मदारी या चित्रपटातील ‘लकीरें बहुत अजीब होती हैं, खाल पर खींच जांए तो खून निकाल देती है और जमीन पर खींच जाएं तो सरहदें बना देती हैं।’ हे वाक्य सत्य परिस्थितीचे प्रतिबिंब आहे.

साहेब बीवी और गँगस्टर

‘हमें मोहब्बत है इसलिए जाने दिया, जिद होती तो बाहों में होती’ हा इरफानचा संवाद युवावर्गात खूप गाजतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी