Independence Day 2022: या 5 बॉलिवूड कलाकारांनी चित्रपटांमध्ये दाखवला देशभक्तीचा रंग, बॉक्स ऑफिसच्या गल्ला झाला होता दंग, मोडले सगळे रेकॉर्ड

बी टाऊन
भरत जाधव
Updated Aug 15, 2022 | 09:54 IST

आज 15 ऑगस्ट (August 15) रोजी देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष (75th year of independence) साजरे करत आहे. स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) अमृत महोत्सवाचा (Amrit Mahotsav) रंग प्रत्येक भारतीयांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. सिनेविश्वात देशभक्तीचा रंग वर्षानुवर्षे पाहायला मिळत आहे.

These 5 Bollywood actors filled the color of patriotism in their films
या 5 बॉलिवूड कलाकारांनी चित्रपटांमध्ये भरला देशभक्तीचा रंग  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सिनेविश्वात देशभक्तीचा रंग वर्षानुवर्षे पाहायला मिळत आहे.
  • आज 15 ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत आहे.
  • बॉलीवूडमध्ये जेव्हाही देशभक्तीपर चित्रपटांचा विचार केला जातो तेव्हा सगळ्यात आधी मनोज कुमार यांचे नाव पुढे येते.

Actors Worked in Patriotic Films: आज 15 ऑगस्ट (August 15) रोजी देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष (75th year of independence) साजरे करत आहे. स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) अमृत महोत्सवाचा (Amrit Mahotsav) रंग प्रत्येक भारतीयांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. सिनेविश्वात देशभक्तीचा रंग वर्षानुवर्षे पाहायला मिळत आहे. बॉलीवूडमध्ये (Bollywood) असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी चित्रपटांमधून देशभक्तीचा रंग प्रत्येक नागरिकांच्या मनात भरला. लोकांनी  चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची तर लोकांनी प्रशंसा केलीच पण चित्रपटांचे डायलॉगही खूप गाजले.

काही चित्रपट आजही लोकांच्या मनावर राज्य करत असून त्यातील संवाद लोकांच्या तोंडात सहजगत्या येत असतात. स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड कलाकारांबद्दल सांगत आहोत, ज्यांनी चित्रपटांमध्ये देशभक्तीचा असा रंग भरला ज्यांच्यामुळे नागरिकांच्या मनात देशाविषयाचा अभिमान वाढवला. 

मनोज कुमार

या यादीत मनोज कुमार यांचे नाव पहिले आहे. बॉलीवूडमध्ये जेव्हाही देशभक्तीपर चित्रपटांचा विचार केला जातो तेव्हा सगळ्यात आधी एकाच अभिनेत्याचे नाव येते आणि ते म्हणजे मनोज कुमार.   मनोज कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक देशभक्तीपर चित्रपट केले आहेत. या चित्रपटांमधील सर्वात हिट ठरलेल्या चित्रपटात 'उपकार', 'पूरब आणि पश्चिम', 'शहीद' आणि 'क्रांती' यांचा समावेश आहे.

नाना पाटेकर

tirranga

देशभक्तीपर चित्रपटांचा विचार केला तर नाना पाटेकर यांचा 'तिरंगा' चित्रपट कसा विसरता येईल.  हा चित्रपट 1993 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नाना पाटेकर यांच्याशिवाय राजकुमारही मुख्य भूमिकेत होते. एका खतरनाक गुन्हेगाराचे मनसुबे उधळून लावण्याची या चित्रपटाची कथा आहे. ज्यामध्ये नाना पाटेकर ब्रिगेडियर सूर्यदेव म्हणजेच राजकुमार यांना मदत करतात. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भूकंप केला होता. 

सनी देओल

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Iyan Amjad (@iyanamjad)

जेपी दत्ता यांचा 'गदर: एक प्रेम कहानी' हा चित्रपट भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर आधारित आहे. या चित्रपटात अमिषा पटेल सकिनाच्या भूमिकेत होती तर सनी देओल तारा सिंगच्या भूमिकेत होता. तारा सिंग पाकिस्तानमध्ये गदर कसा करतो  हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाशिवाय सनी देओलच्या 'मां तुझे सलाम', 'इंडियन' आणि 'होरीझ' या चित्रपटांचाही समावेश आहे.

अजय देवगन

अजय देवगणनेही असे अनेक बॉलीवूड चित्रपट केले जे देशभक्तीने ओतप्रोत होते. या चित्रपटांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'द लिजेंड ऑफ भगत सिंग'. या चित्रपटात अजय देवगणने शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अजय देवगणच्या अभिनयाचे इतके कौतुक झाले की आजही लोक या चित्रपटाचे कौतुक करताना थकत नाहीत.

अक्षय कुमार

airlift

देशभक्तीपर चित्रपट करण्यात अक्षय कुमारच्या नावाचाही समावेश आहे. या चित्रपटांमध्ये 'बेबी', 'एअरलिफ्ट' आणि 'अब तुम्हारे हवाले वतन साथी' यांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांमध्ये अक्षय कुमारने देशप्रेमाचा रंग असा रंगवला होता की, आजही लोकांना या अभिनेत्याचे चित्रपट आठवतात.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी