Janmashtami 2022 : 'ही' गाणी ऐकल्याशिवाय जन्माष्टमीचा उत्सव पूर्णच होऊ शकत नाही

बी टाऊन
Updated Aug 19, 2022 | 12:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Janmashtami 2022 : श्री कृष्णाचा जन्म झाला तो दिवस जन्माष्टमी (Janmashtami) म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या उत्सवाला हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान मिळाले आहे. जन्माष्टमी, दहीहंडीचा उत्सव बॉलिवूडच्या सिनेमांमध्येही ( Bollywood movies ) मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे बॉलिवूडच्या सिनेमांमधील ही गाणी तुमच्या उत्सवात भरच टाकतात. त्यामुळे ही पाच गाणी आजच्या दिवशी तुम्ही ऐकली नाहीत तर तुमचा जन्माष्टमीचा उत्सव पूर्णच होऊ शकत नाही.

These 5 bollywood songs must listen on the occasion f Janmashtami
बॉलिवूडचा दहीहंडी उत्सव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जन्माष्टमीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे
  • बॉलिवूडच्या सिनेमांमध्येही दहीहंडी जल्लोषात साजरी करण्यात येते
  • ही गाणी ऐकल्याशिवाय जन्माष्टमी, दहीहंडी साजरीच होऊ शकत नाही

Janmashtami 2022 : श्री कृष्णाचा जन्म झाला तो दिवस जन्माष्टमी (Janmashtami) म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या उत्सवाला हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान मिळाले आहे. जन्माष्टमी, दहीहंडीचा उत्सव बॉलिवूडच्या सिनेमांमध्येही ( Bollywood movies ) मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे बॉलिवूडच्या सिनेमांमधील ही गाणी तुमच्या उत्सवात भरच टाकतात. त्यामुळे ही पाच गाणी आजच्या दिवशी तुम्ही ऐकली नाहीत तर तुमचा जन्माष्टमीचा उत्सव पूर्णच होऊ शकत नाही. 

मच गया शॉट सारी नगरी मै, खुद्दार

हे सुपरहिट गाणे 1982 मध्ये आलेल्या 'खुद्दार' चित्रपटातील आहे. मुंबई, महाराष्ट्रात ‘दहीहंडी’ कशी साजरी केली जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे. अमिताभ बच्चन आणि परवीन बाबीवर हे गाणं शूट करण्यात आलं आहे. या गाण्याशिवाय दहीहंडीचा उत्सव अपूर्णच आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी या गाण्याला आवाज दिला.

 

अधिक वाचा : जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

 


वो किसना है, किसना


2005 साली रिलीज झालेल्या 'किसना' सिनेमातील 'वो किसना है' हे गाणे आजही लोकांच्या जिभेवर आहे. हे गाणे गायक सुखविंदर सिंगने आपल्या सुरेल आवाजात गायले आहे.
अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ईशा शेरवानी यांच्यावर हे गाणं शूट करण्यात आलं आहे. गाण्याचे संगीत इस्माईल दरबार यांनी दिले असून जावेद अख्तर या गाण्याचे गीतकार आहेत.


राधा कैसे ना जले, लगान

लगान सिनेमातील या गाण्याशिवाय जन्माष्टमी उत्सव पूर्णच होऊ शकत नाही. राधा-कृष्णाच्या प्रेमाचे वर्णन करणारे 'राधा कैसे ना जलें' या गाण्याने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. आमिर खान आणि ग्रेसी सिंगवर शूट करण्यात आलेलं हे गाणं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायले होते. त्याचे संगीत ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी दिले होते आणि जावेद अख्तर यांनी लिहिले होते

 

अधिक वाचा : सपना चौधरीच्या ठुमक्यांवर थिरकत बीडमध्ये दहीहंडी


गो गो गोविंदा, ओ माय गॉड

हे गाणे 2012 मध्ये आलेल्या 'ओ माय गॉड' चित्रपटातील आहे. दहीहंडीच्या वेळी सगळे गोविंदा या गाण्यावर उत्साहाने आणि जोषात नाचतात. प्रभुदेवा आणि सोनाक्षी सिन्हावर शूट करण्यात आलेलं हे गाणं श्रेया घोषाल आणि अमन त्रिखा यांनी गायले आहे.


यशोदा का नंदलाला, संजोग

1985 मध्ये आलेल्या 'संजोग' चित्रपटातील 'यशोदा का नंदलाला' या गाण्यात आईचे आपल्या मुलावरचे प्रेम दाखवण्यात आले आहे. या गाण्याला लता मंगेशकर यांनी आपला आवाज दिला आहे. या चित्रपटात जितेंद्र, जयाप्रदा आणि विनोद मेहरा हे कलाकार होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी