OTT Releases in January: हे 5 चित्रपट आणि वेबसीरिज या महिन्यात OTT वर रिलीज होतील, एन्टरेटेन्मेंटचा फूल डोस

बी टाऊन
Updated Jan 09, 2022 | 18:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

OTT Releases in January: गतवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म सज्ज झाला आहे. आगामी वेबसीरिज आणि सिनेमा यंदाही प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाले आहेत.

OTT Releases in January
ओटीटीवर मिळणार एन्टरटेन्मेंटचा फुल टू डोस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 2021 मध्ये सुमारे 400 वेबसीरिज आणि सिनेमा ओटीटीवर रिलीज झाले आहेत.
  • जानेवारीमध्ये हे 5 सिनेमा आणि वेबसीरिज रिलीज होणार.
  • ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मनोरंजनाचा तडका

OTT Releases in January:  कोरोना वाढत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा लोकांसाठी थिएटरचा पर्याय बंद झाला असून लोकांना घरातच राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत लोक पुन्हा त्यांच्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये, OTT प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) सुमारे 400 बेबसीरिज आणि चित्रपट रिलीज झाले.आता या वर्षी म्हणजे 2022 मध्ये देखील OTT प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) बरेच काही आहे. या जानेवारीत लोकांना मनोरंजनाची कमतरता भासणार नाही. जानेवारी महिन्यात कोणते सिनेमा आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत याची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Ye Kali Kali Aankhen:

श्वेता त्रिपाठी आणि ताहिर भसीन स्टारर थ्रिलर वेबसीरिज ये काली काली आखें या महिन्याच्या १४ तारखेला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या वेबसीरिजची कथा प्रेम आणि उत्कटतेने भरलेली असणार आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनी आधीच पसंती दिली आहे.

Campus Diaries

तुम्हाला पुन्हा एकदा कॉलेजच्या दिवसांत जायचे असेल तर ही वेबसीरिज तुमच्यासाठी योग्य आहे. ही मालिका तुम्हाला पुन्हा एकदा कॉलेज कॅम्पसमध्ये घेऊन जाईल. MX Player ची ही वेबसीरिज ७ जानेवारीला रिलीज झाली आहे.

Eternals:

मार्वल स्टुडिओ पुन्हा एकदा तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा ११ जानेवारीला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. हा सिनेमा गेल्या वर्षी ५ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात अँजेलिना जोली, कुमेल नानजियानी, गेम्मा चॅन, रिचर्ड मॅडेन, लॉरेन रिडलॉफ, सलमा हेक आणि ब्रायन टायरी हेन्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Human:

ड्रग ट्रायल्सवर आधारित 'ह्यूमन' ही वेबसीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर १४ जानेवारी रोजी प्रसारित केली जाईल, ज्याची कथा गरीब लोकांवर बेकायदेशीर ड्रग चाचण्यांवर आहे. 
या वेबसीरिजमध्ये शेफाली शाह, विशाल जेठा, कीर्ती कुल्हारी, सीमा बिस्वास, राम कपूर आणि आदित्य श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Kaun Banegi Shikharwati

ही वेबसीरिज झी ५ वर ७ जानेवारीला रिलीज झाली आहे. ज्यामध्ये नसीरुद्दीन शाह, सोहा अली खान, लारा दत्ता, कृतिका कामरा आणि रघुबीर यादव यांसारखे अनेक मोठे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी