Bold Web Series 2022: या 5 आगामी वेब सीरिज कुटुंबासह पाहण्यासारख्या नाहीत, बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.

बी टाऊन
Updated May 05, 2022 | 18:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bold Web Series 2022: या अशा वेब सीरीज आहेत ज्यात बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत आणि त्यांना कुटुंबासह पाहण्याची चूक करू नका.

These 5 upcoming web series  crossing all the boundaries of boldness
2022 मधील बोल्ड वेबसीरिज  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • या 5 आगामी वेबसीरिजने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा
  • आधा इश्क रोमॅण्टिक थ्रील वेबसीरिज
  • मिर्झापूरचा सीझन 3, बोल्ड आणि हॉट वेबसीरिज

Bold Web Series 2022: आजकाल बॉक्स ऑफिसवर पॅन इंडियन चित्रपटांचा बोलबाला आहे, परंतु आता मोठ्या संख्येने प्रेक्षक ओटीटीकडे वळत आहेत. आजकाल वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर अनेक छान वेब सिरीज रिलीज होत आहेत, ज्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी अशा अनेक वेब सीरीज आहेत ज्यात बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्या वेबसीरिज कुटुंबासह पाहण्याची चूक करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा पाच वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत.

1. आधा इश्क

Voot Select | Aadha Ishq | New Original Series | May 12| Aamna Sharif,  Gaurav Arora - YouTube

आधा इश्क ही एक रोमँटिक थ्रिलर आहे जी 12 मे 2022 रोजी Voot वर रिलीज होईल. वेब सीरिजमध्ये काश्मीर आणि मसुरीच्या सुंदर मैदानांचे चित्रण करण्यात आले आहे, जिथे एक रोमांचक कथा चित्रित करण्यात आली आहे. आधा इश्क ही प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित वेब सीरिज आहे ज्यामध्ये मुख्य अभिनेत्री ती ज्या मुलाच्या प्रेमात पडते तो तिच्या आईचा एक्स बॉयफ्रेंड आहे. या वेब सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन्स शूट करण्यात आले आहेत 

2. एक थी बेगम

Ek Thi Begum - An MX Original Series : Episodes, Seasons, Videos, Photos,  Synopsis, Cast & Crew of Ek Thi Begum - An MX Original Series
रोमँटिक थ्रिलर 'एक थी बेगम' चा सीझन 3 सप्टेंबर 2022 मध्ये MX Player वर रिलीज होत आहे. वेब सिरीजमध्ये एका महिलेची कथा दाखवण्यात आली आहे जी आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संपूर्ण गुन्हेगारी गटाशी पंगा घेते. ती तिच्या प्रयत्नात यशस्वी होईल का? की तिला संधी मिळण्याआधीच गुन्हेगार तिच्याच मुसक्या आवळणार? 'एक थी बेगम' देखील बोल्डनेसच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही.


3. व्हर्जिन रिव्हर सीझन-4

Virgin River Season 4 Release Date And Everything That You Need To Know

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे नेटफ्लिक्सने 'व्हर्जिन रिव्हर' या हॉट वेब सीरिजला दोन नवीन सीझनसाठी फ्लॅग ऑफ केले आहे. रोमँटिक, सस्पेन्सफुल वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. व्हर्जिन रिव्हरचा चौथा सीझन कधी रिलीज होईल याची पुष्टी झालेली नाही. पण ही वेबसीरिज कुटुंबासोबत पाहण्यासारखी नक्कीच नाही. 

4.The Summer I Turned Pretty

A Series Based on 'The Summer I Turned Pretty' by Jenny Han Is Coming to  Amazon | Nerds & Beyond

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने अलीकडेच जाहीर केले की ते वेब सीरिजसाठी 'जेनी हान'च्या कादंबरीवर आधारित 'द समर आय टर्न्ड प्रिटी' ही नवीन वेब सिरीज आणत आहेत. ही वेबसीरिज 17 जूनला रिलीज होणार आहे. यात एक मुलगी आणि दोन भावांमधील प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला आहे. 
यासोबतच त्यांच्यातील बोल्ड सीन्सही खूप चर्चेत आहेत.


5. मिर्जापुर सीजन 3

Mirzapur Web Series: Review, Trailer, Star Cast, Songs, Actress Name, Actor  Name, Posters, News & Videos
'मिर्झापूर'चा सीझन 1 आणि 2 प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला. आता चाहत्यांना त्याच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे. 'मिर्झापूर सीझन 3' या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. वेब सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन्स दाखवण्यात आले होते, ज्यामुळे ती अॅडल्टच्या श्रेणीत टाकण्यात आली होती. तिसरा सीझन देखील खूप बोल्ड असेल यात शंकाच नाही त्यामुळे तो एकट्याने पाहणे चांगले असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी