Bollywood celebrities : राखी सावंतसह या 6 सेलिब्रिटींनी केले गर्भाशयातील एग्ज फ्रोजन, जाणून घ्या कोण आहेत या सेलिब्रिटी

बी टाऊन
Updated Apr 04, 2022 | 18:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bollywood celebrities :केवळ राखी सावंतच नाही तर या 6 सेलेब्सनीही त्यांची एग्ज फ्रोजन केली आहेत. काहींनी वर्षापूर्वी केले होते तर काहींनी काही महिन्यांपूर्वी केले होते.

These 6 Celebrities With Rakhi Sawant have Frozen their eggs to become mother later on , Find Out Who These Celebrities Are
या सेलिब्रिटींनी केली आहेत गर्भाशयातील एग्ज फ्रोजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या अनेक सेलिब्रिटी गर्भाशयातील एग्ज फ्रोजन करत आहेत.
  • एग्ज फ्रोजन करण्याची प्रक्रिया गर्भधारणेशी संबंधित आहे
  • हॉलिवूडमध्येही हाच ट्रेंड आहे.

Pregnancy: सेलिब्रिटींसाठी त्यांची एग्ज फ्रोजन करणे सामान्य झाले आहे. फ्रीझिंग एग्ज ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये स्त्रिया त्यांची गर्भधारणा झालेली एग्ज वैद्यकीय प्रक्रियेद्वारे फ्रीज करतात.आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींना फ्रीज एग्ज मिळाली आहेत किंवा एम्ब्रो फ्रीज केली आहेत त्यांना फ्रीज करण्याचा उद्देश हा आहे की त्यांना त्यांच्या वाढत्या वयात आई होण्यास कोणतीही अडचण येत नाही कारण महिलांना एका वयानंतर गर्भवती होण्यास वेळ लागतो. त्यामुळे राखी सावंतसह या 6 अभिनेत्रींनीही आपली एग्ज फ्रोजन केलेली आहेत. 

राखी सावंत

Rakhi Sawant: People said I lied about my marriage for publicity but now I  am entering Bigg Boss 15 with my husband Ritesh - Times of India

बिग बॉस 14 नंतर राखीने खुलासा केला होता की तिने भविष्यात आई होण्यासाठी तिची एग्ज फ्रीज केलेली आहेत. विकी डोनर या चित्रपटाचा संदर्भ देत राखीने असेही म्हटले होते की, तिला कोणत्याही विकी डोनरवर अवलंबून राहायचे नाही, त्यामुळे तिने एग्ज फ्रीड केली आहेत. 


सुकीर्ति कंदपाल 

'दिल मिल गए' या मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या सुकिर्तीनेही तिची एग्ज फ्रीज केलेली आहेत. पण, तिला कधी आई व्हायचे आहे, याचा तिने काहीही विचार केलेला नाही.


कोर्टनी कर्दाशियन

kourtney kardashian italy holiday

केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलिवूडचे सेलिब्रिटीही आपली एग्ज फ्रीज करतात. रिअॅलिटी शो 'कीपिंग अप विथ द कार्दशियन्स' स्टार कोर्टनी ही 3 मुलांची आई आहे आणि तिने वर्षापूर्वी तिची एग्ज फ्री केली होती. 

एकता कपूर 

Ekta Kapoor suspends all her productions amid coronavirus outbreak - Times  of India
एकता ३६ वर्षांची असताना तिने तिची एग्ज फ्रीज केली होती.  तिला माहित होते की तिला कधी ना कधी आई व्हायचे आहे, परंतु तिला कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये म्हणून तिने तिची एग्ज फ्रीज करून ठेवली होती ज्यामुळे ती आईसुद्धा झाली. 


तनीशा मुखर्जी

काजोलची बहीण आणि अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिने वयाच्या ३९ व्या वर्षी तिची एग्ज फ्रीज केली होती. यानंतर तिला त्याच्या वजनाबाबतही समस्या आल्या होत्या, ज्याचा उल्लेख तनिषाने केला होता.


किम कर्दाशियन

अब्जाधीश किम कार्दशियनने तिची बहीण कोर्टनीप्रमाणेच तिचे एग्ज काही वर्षांपूर्वी फ्रीज केले होते. तिला हा सल्ला अनेक डॉक्टरांनी दिला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी