The richest actresses of south film industry :जेव्हा दाक्षिणात्य चित्रपटांना बॉलिवूडमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळू लागला तेव्हा त्यातील कलाकारांची लोकप्रियताही वाढली.
चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टार्सबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचे आहे. या लेखात आम्ही दक्षिणेतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत. या यादीत सामंथा ते रश्मिका मंदान्ना यांचा समावेश आहे.
समंथा रुथ प्रभू एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये मानधन घेते. ती टॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रिपोर्टनुसार, समंथाची एकूण संपत्ती 89 कोटी आहे.
'पुष्पा' फेम रश्मिका मंदान्नाला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. रिपोर्टनुसार, रश्मिकाची फी 3 कोटी आहे.
रकुल प्रीत सिंग साऊथसोबत बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. एका चित्रपटासाठी तिची फी 3.5 कोटी आहे.
टॉलिवूडमध्ये चमक दाखवल्यानंतर पूजा हेगडे आता बॉलिवूडमध्ये काम करत आहे. 'कभी ईद कभी दिवाळी'मध्ये ती सलमान खानसोबत दिसणार आहे. पूजा एका चित्रपटासाठी ५ कोटी रुपये घेते.
तमन्ना भाटिया ही तमिळ इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. अहवालानुसार,तिची एकूण संपत्ती सुमारे 110 कोटी रुपये आहे.
'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टी आपल्या अभिनयाने नेहमीच साऱ्यांना प्रभावित करते.अनुष्का एका चित्रपटासाठी ४ कोटी रुपये घेते.
नयनतारा लवकरच शाहरुख खानसोबत 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती प्रामुख्याने तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपट करते. नयनताराची एकूण संपत्ती 15.17 कोटी असल्याची माहिती आहे.