Bollywood Actress: पतीपासून घटस्फोट घेऊन या अभिनेत्रींनी थाटला नवा संसार; काही झाल्या आई तर काही आहेत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये  

Actress Live In Relationship After Divorce । लग्न मोडल्यानंतरही काही अभिनेत्रींचा प्रेमावरील विश्वास उडाला नाही आणि त्यांनी त्यांना दुसरी संधी देत लिव्ह-इन रिलेशनशिपचा प्रयत्नही केला आहे. सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींचे नाते सतत बिघडत चालले आहे.

These Bollywood actresses are divorced and living in a live-in relationship
पतीपासून घटस्फोट घेऊन या अभिनेत्रींनी थाटला नवा संसार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूडसाठी घटस्फोटाचा प्रकार काही नवीन नाही.
  • घटस्फोटित अभिनेत्रींच्या यादीत मलायका अरोरा अग्रस्थानी आहे.
  • काम्या पंजाबीनेही पहिल्यांदा बंटी नेगीशी लग्न केले होते.

Actress Live In Relationship After Divorce । मुंबई : लग्न मोडल्यानंतरही काही अभिनेत्रींचा प्रेमावरील विश्वास उडाला नाही आणि त्यांनी प्रेमाला दुसरी संधी देत लिव्ह-इन रिलेशनशिपचा प्रयत्न केला आहे. सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींचे नाते सतत बिघडत चालले आहे. अनेक जोडपी लग्नाच्या काही वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात, तर काही लवकरच एकमेकांपासून वेगळे होतात. मात्र नाते तुटल्यानंतरही या लोकांचा खऱ्या प्रेमावरचा विश्वास उडल्याचे क्वचितच पाहायला मिळते. (These Bollywood actresses are divorced and living in a live-in relationship). 

अधिक वाचा : एका आठवड्यात महापालिका निवडणुका जाहीर करा- SC

घटस्फोट झाल्यानंतर लव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या अभिनेत्री 

आज आपण अशा काही अभिनेत्रींबाबत भाष्य करणार आहोत ज्यांनी आपल्या पतीकडून घटस्फोट घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपल्या प्रेमाला आणखी एक संधी देत प्रेमावर विश्वास ठेवला आहे आणि दुसऱ्या लग्नापूर्वी बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. 

मलायका अरोरा - अर्जुन कपूर (Malaika Arora And Arjun Kapoor) 

malaika arora and arjun kapoor

मलायका अरोरा या यादीत सर्वात अग्रस्थानी आहे. मलायका अरोराने अरबाज खान सोबतचे आपले १८ वर्षांचे नाते तोडून घटस्फोट घेतला आणि आता अर्जुन कपूर सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. 

काम्या पंजाबी - शलभ डांग (Kamya Punjabi and Shalabh Dang)

Kamya Punjabi and Shalabh Dang

काम्या पंजाबीनेही पहिल्यांदा बंटी नेगीशी लग्न केले होते. या लग्नानंतर या दोघांना एक मुलगी झाली आहे. काम्या आणि बंटीचे नाते जवळपास एक दशक टिकले आणि २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर काम्याने दिल्लीतील घटस्फोटित उद्योगपती शलभ डांग याच्याशी लग्न केले, त्याला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे. काम्या आणि शलभ लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहत होते, असे म्हटले जाते. सध्या दोन मुले काम्या आणि शलभ असा परिवार आहे.

कल्की कोचलिन - गाय हर्शबर्ग (kalki koechlin and guy hershberg)  

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिनने चित्रपट निर्माता अनुराग कश्यपशी लग्न केले. मात्र लगेचच दोघेही वेगळे झाले आणि कल्कीने गाय हर्षबर्गला डेट करायला सुरुवात केली. दोघे लिव्ह-इनमध्ये एकत्र राहू लागले आणि लग्न न करता कल्कीने गाय हर्शबर्गच्या मुलीला जन्म दिला.

पूजा बत्रा- नवाब शाह (Pooja Batra and Nawab Shah) 

Pooja Batra and Nawab Shah

अभिनेत्री पूजा बत्रा सध्या नवाब शाहसोबत वैवाहिक जीवनाचा आनंद लुटत आहे. तसेच नवाब शाहच्या आधी २००२ मध्ये पूजा बत्राने सर्जन सोनू अहलुवालियाशी लग्न केले, जे फार काळ टिकले नाही. माहितीनुसरा, लग्नापूर्वी पूजा बत्रा आणि नवाब शाह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

दिया मिर्झा - वैभव रेखी (Dia Mirza And Vaibhav Rekhi) 

अभिनेत्री दिया मिर्झाने साहिल संघासोबत घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याचवेळी दिया मिर्झाने वैभव रेखीशी लग्न केले आणि एका मुलाला जन्म दिला. साहिलसोबत लग्नापूर्वी दीया लिव्ह-इनमध्ये राहत होती, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. लग्नापूर्वीच ती गरोदर राहिली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी