Actress From Royal Family: बॉलीवूडच्या या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात राजघराण्यातील आहेत, जाणून घ्या

बी टाऊन
Updated May 16, 2022 | 17:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Actress From Royal Family: चित्रपटांमध्ये आपण अनेक अभिनेत्रींना राजकुमारी आणि राणीच्या भूमिकेत पाहिले आहे. पण खूप कमी लोकांना माहित आहे की अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्या केवळ चित्रपटांमध्येच नाही तर वास्तविक जीवनातही राजकुमारी आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रींची यादी दाखवणार आहोत.

 These Bollywood actresses are from the royal family in real life
या अभिनेत्री आहेत राजघराण्यातील  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राजघराण्यातील आहेत या अभिनेत्री
  • बॉलिवूडच्या या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहेत राजकुमारी
  • राजकन्या ते अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास

Actress From Royal Family: चित्रपटांमध्ये आपण अनेक अभिनेत्रींना राजकुमारी आणि राणीच्या भूमिकेत पाहिले आहे. पण खूप कमी लोकांना माहित आहे की अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या केवळ चित्रपटांमध्येच नाही तर वास्तविक जीवनातही राजकुमारी आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रींची यादी दाखवणार आहोत.

Sagarika Ghatge Khan 

Bridal pic: Sagarika Ghatge's wedding lehenga
चक दे ​​इंडिया या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली अभिनेत्री आणि क्रिकेटपटू झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे ही कोल्हापूर, कागलच्या राजघराण्यातील आहे. सागरिका ही सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते विजेंद्र घाटगे यांची मुलगी आहे.

I had a great desire to have a child with Aamir: Kiran Rao | Hindi Movie News - Times of India


Kiran Rao 

आदिती राव हैदरीची चुलत बहीण किरण राव ही तेलंगणाच्या राजघराण्याशी संबंधित आहे. त्यांचे आजोबा जे. रामेश्वर राव हे पूर्वीच्या तेलंगणा राज्यातील वानापर्थी संस्थानाचे राजा होते.

 

sisters: We are the best friends: Riya and Raima Sen | Hindi Movie News - Times of India
Riya Sen and Raima Sen 


बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन आणि रायमा सेन या दोघी बहिणी आहेत आणि दोघीही राजघराण्यातील राजकन्या आहेत. तिचे वडील भरत देव वर्मा त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत आणि तिची आई मुनमुन सेन बडोदा संस्थानातील राजा सयाजीराव गायकवाड यांची तिसरी मुलगी आहे. इतकंच नाही तर रिया आणि रायमाची आजी इला देवीही कूचबिहारची राजकुमारी होती.

Bhagyashree opens up on the real reason for taking a break from films | Hindi Movie News - Times of India
Bhagyashree 


'मैने प्यार किया' या सिनेमातून चित्रपटसृष्टीत करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री भाग्यश्री खऱ्या आयुष्यातील राजकुमारी आहे. ती सांगली, महाराष्ट्रातील राजेशाही पटवर्धन घराण्याशी संबंधित आहे. त्यांचे वडील विजयसिंह राव माधव राव पटवर्धन हे सांगलीचे राजे होते.

Aditi Rao Hydari's red bridal lehenga is beyond BEAUTIFUL - Times of India
Aditi Rao Hydari 


बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अदिती राव हैदरी ही दोन राजघराण्यातील वंशज आहे. त्यांचे आजोबा जे. रामेश्वर राव हे वानापर्थी राज्याचे नेते होते तर त्यांचे आजोबा मुहम्मद सालेह अकबर हैदरी होते.


Alisha Khan 


अभिनेत्री अलिशा खान तिच्या सौंदर्याची जादू फिल्मी दुनियेत निर्माण करू शकली नाही, पण ही अभिनेत्री तिच्या कुटुंबाची गोंडस राजकुमारी आहे. अलीशा खानचा जन्म मोहम्मद नवाब गाजियाउद्दीन खान यांच्या राजघराण्यात झाला, ज्यांच्या नावावरून दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादचे नाव पडले.

Exclusive! 'We actors barely get time for ourselves, this break is helping me to connect with myself,' says Sonal Chauhan | Hindi Movie News - Times of India
Sonal Chauhan  


सोनल चौहान यांना केवळ राजपूतांचे आडनावच नाही तर त्यांची राजेशाही देखील आहे. ती उत्तर प्रदेशातील राजपूतांच्या राजघराण्यातील आहे.


Mohina Kumari 


ये रिश्ता क्या कहलाता या टीव्ही मालिकेत दिसलेली मोहिना कुमारी रीवाच्या राजघराण्यातील आहे. कोरिओग्राफर-डान्सर बनलेली अभिनेत्री मोहना ही रेवाचे महाराज मार्तंड सिंग यांची नात आहे.

Sara Ali Khan: I feel lucky and privileged | Hindi Movie News - Times of India
Sara Ali Khan 

अभिनेत्री सारा अली खान देखील राजघराण्यातील आहे, तिचे आजोबा मन्सूर अली खान हे पतौडीचे नवाब होते. तिचे वडील अभिनेता सैफ अली खान
बॉलिवूडमधील अभिनेता आहे 

Soha Ali Khan has healthy feast ideas for festival season | Hindi Movie News - Times of India
Soha Ali Khan 


बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान नवाब घराण्यातील आहे. तिचे वडील मन्सूर अली खान 1952 ते 1971 पर्यंत पतौडीचे नवाब होते. सोहाचे आजोबा इफ्तिखार अली खान हे पतौडी घराण्याचे आठवे नवाब होते आणि तिची आजी साजिदा सुलतान या भोपाळच्या बेगम होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी