Web series and Movies on OTT : तब्बल तीन वर्षांनंतर थिएटर पूर्णपणे उघडली आहेत. कोरोनाच्या काळात लोकांना घरबसल्या त्यांचे मनोरंजन OTT प्लॅटफॉर्मवरच पाहायला मिळाले. सिनेमा हॉल सुरू झाल्यानंतरही कोरोनाच्या भीतीने अनेकजण गर्दीत जाण्याचे टाळत आहेत. अशा परिस्थितीत आलिया भट्टच्या चाहत्यांना तिचा गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा पाहण्याची इच्छा आहे.
आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी पाहण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेकांनी गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिला, पण काहींना चित्रपट पाहायला जाता आले नाही. त्यांच्यासाठी हा सिनेमा 26 एप्रिलला म्हणजेच आज OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. आलिया भट्ट स्टारर हा सिनेमा नेटफ्लिक्सवर आला आहे.
या सिनेमातील आलियाच्या अभिनयाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आलियाचा दमदार अवतार पाहून तिचे चाहते हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहत आहेत.थिएटरमध्ये दाखल झाल्यानंतर हा सिनेमा नेटफ्लिक्सवरही रिलीज झाला आहे. जे घरून कामावर आहेत किंवा ज्यांना घरी रिकाम्या बसून कंटाळा येत आहे, ते आता या सिनेमाचा आनंद घेऊ शकतात.
आलिया भट्टच्या गंगूबाई व्यतिरिक्त अक्षय कुमारचा मिशन सिंड्रेला हा सिनेमाही २९ एप्रिलला रिलीज होत आहे. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज केला जाईल. या चित्रपटात अक्षयसोबत रकुलप्रीत सिंगही दिसणार आहे. या चित्रपटात प्रेम, रोमान्ससोबतच बराच काही ड्रामाही पाहायला मिळणार आहे.
मिशन सिंड्रेलासोबतच तापसी पन्नूचा 'मिशन इम्पॉसिबल' देखील २९ एप्रिलला रिलीज होत आहे.हा एक तेलुगु चित्रपट आहे, ज्यामध्ये तापसीसोबत भानू प्रकाशन, हर्ष रोशन इत्यादी दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमात कॉमेडीसोबतच तापसीचे मुलांसोबतचे अनोखे नाते दाखवण्यात येणार आहे.
29 एप्रिल रोजी, तुमच्याकडे OTT वर टाइमपास करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. नेव्हर किस युवर बेस्ट फ्रेंड देखील त्याच दिवशी रिलीज होत आहे. ही एक वेब सिरीज आहे, ज्यामध्ये दोन मित्रांची अनोखी कहाणी दाखवण्यात आली आहे. ही वेबसीरिज Zee5 वर रिलीज होणार आहे.