मुंबई: द कपिल शर्मा शो(kapil sharma show) टेलिव्हिजनवरील सर्वात फेमस कॉमेडी शोमधील(comedy show) एक आहे. यात होस्ट कॉमेडियन-अभिनेता कपिल शर्मा(kapil sharma) आहे. अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती कपिल शर्माच्या शोमध्ये येतात आणि आपल्या प्रोजेक्टसचे प्रमोशन करतात. तर असे काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी कपिल शर्माच्या शोचा भाग होण्यास स्पष्ट नकार दिला होता. जसे नुकतेच कपिल शर्मा शोच्या सेटवर महाभारतमधील कलाकारांना बोलवण्यात आले होते. यात मुकेश खन्ना यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांनी या शोमध्ये येण्यास नकार दिला. इतकंच नव्हे तर मुकेश खन्ना यांनी कपिल शर्माच्या शोवर टीकाही केली.
अभिनेते मुकेश खन्ना यांचे म्हणणे होते की यो शोमध्ये डबल मिनिंगचे जोक सांगितले जातात. तसेच मुले मुलींप्रमाणे तयार होत घाणेरडे इशारे करतात. मुकेश खन्नांनी इतकंही सांगितलं की ते कधीच या शोमध्ये येणार नाहीत. मुकेश यांच्या या विधानावरून खूप वाद झाला होता आणि महाभारतातील काही कलाकारांसोबत त्यांचा वाद सुरू झाला होता. दरम्यान कपिल शर्मा आणि त्यांच्या टीमकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
सुपरस्टार रजनीकांत यांना कोण ओळखत नाही? थलायवा स्टार रजनीकांतलाही कपिल शर्माच्या शोमध्ये येण्यासाठी बऱ्याचदा निमंत्रण देण्यात आले मात्र त्यांनी कधीही हे निमंत्रण स्वीकारले नाही.
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर याही कपिल शर्माच्या गेस्ट लिस्टमधील भाग आहेत. कपिल शर्मा शोच्या सेटवरून त्यांना पाहुण्या म्हणून अनेकदा आमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांनी विन्रमपणे हा प्रस्ताव नाकारला. कपिल शर्माला सिंगिग खूप आवडते. त्यामुळे लता मंगेशकर या शोमध्ये येणे त्यासाठी मोठी गोष्ट आहे.
सचिनला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिन तेंडुलकर आपल्या बायोपिकच्या प्रमोशनदरम्यानही कपिल शर्मा शोमध्ये दिसला नव्हता. कपिल शर्मा शोचे जुने परीक्षक आणि क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू यांनी त्याला आमंत्रित केले होते. दरम्यान, व्यस्त वेळापत्रकामुळे ते या शोचा भाग होऊ शकले नाही.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कपिल शर्माच्या शोमध्ये येण्यास नकार दिला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत अनेक व्हिडिओ बनवत एमएस धोनीने आपल्या बायोपिकचे प्रमोशन केले होते. धोनीला कपिलच्या शोमध्ये येण्यास आमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्याने नकार दिला होता.