Jadoo:तारक मेहताच्या या अभिनेत्याने ऋतिकच्या सिनेमात केलंय 'जादू'चं काम

बी टाऊन
Updated Oct 15, 2021 | 15:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

तुम्हाला माहीत आहे का जादूचे कॅरेक्टर कोणी साकारले होते. तारक मेहता का उल्टा चष्मामध्येही या अभिनेत्याने काम केले होते. 

jadoo
या अभिनेत्याने ऋतिकच्या सिनेमात केलंय 'जादू'चं काम 
थोडं पण कामाचं
  • अनेक सिनेमांमध्ये छोटे उस्तादचे काम करणाऱ्या इंद्रवन पुरोहित यांनी बालवीर आणि तारक मेहतासारख्या टीव्ही शोजमध्ये काम केले होते.
  • कोई मिल गया मधील जादूच्या भूमिकेसाठी तब्बल ४० लोकांची ऑडिशन घेण्यात आली.
  • अशातच इंद्रवदन यांना फायनल करण्यात आले.

मुंबई: ऋतिक रोशनचा सिनेमा कोई मिल गया तुम्ही पाहिलाच असेल. या सिनेमात रोहित(ऋतिक रोशन) शिवाय आणखी एका कॅरेक्टरने आपले लक्ष वेधून घेतले होते ते म्हणजे जादू. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत साऱ्यांनाच जादू आवडला होता. तुम्हाला माहीत आहे का की जादूचे कॅरेक्टर कोणी साकारले होते. तारक मेहता का उल्टा चष्मामदध्येही तुम्ही या अभिनेत्याला पाहिले असेल. हा तो प्रसिद्ध चेहरा होतो जो कॉस्ट्युमच्या आत बसून जादूचा रोल प्ले करत होता. त्यांना तुम्ही अनेक टीव्ही शोजमध्ये पाहिले असेल. या अभिनेत्याचे नाव इंद्रवदन पुरोहित आहे. 

अनेक सिनेमांमध्ये छोटे उस्तादचे काम करणाऱ्या इंद्रवन पुरोहित यांनी बालवीर आणि तारक मेहतासारख्या टीव्ही शोजमध्ये काम केले होते. कोई मिल गया मधील जादूच्या भूमिकेसाठी तब्बल ४० लोकांची ऑडिशन घेण्यात आली. अशातच इंद्रवदन यांना फायनल करण्यात आले. जादूच्या रोलमध्ये चेहरा दिसण्याची गरज नव्हती मात्र वजन कमी करणे गरजेचे होते. यासाठी इंद्रवदन पुरोहितने यासाठी खूप मेहनत घेतल आणि वजन घटवले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya (@bollywoodtriviapc)

रिपोर्ट्सनुसार इंद्रवद पुरोहितला जादूचा कॉस्ट्युम घालण्यात आला होता तेव्हा त्याचे वजन १५ किलो होते. हा कॉस्ट्युम राकेश रोशन यांनी परदेशातून बनवून आणला होता. जादूचा हा पोशाख ऑस्ट्रेलियातून भारतात आणण्यात आला होता. यासाठी वर्ष लागले होते. याची किंमत तब्बल १ कोटी रूपये इतकी होती. 

कोई मिल गया हा सिनेमा २००३मध्ये आला होता. या सिनेमात ऋतिक रोशन आणि प्रीती झिंटा यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. कोई मिल गया सिनेमाचा सेट कसौली गावांत लावण्यात आला होता याशिवाय याचे शूटिंग नैनीताल, भीमताल आणि कॅनडामध्येही याची शूटिंग झाली होती. 

तीन राष्ट्रीय पुरस्कार

या सिनेमात तीन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते. सामाजिक मुद्द्यांवर सर्वोत्कृष्ट सिनेमा, कोरिओग्राफी, स्पेशल इफेक्ट्स. सिनेमाच्या स्क्रीनिंगमध्ये अटल बिहारी वाजपेयी सामील होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी