Sonakshai sinha : कतरिना कैफनंतर आता बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री बांधणार बाशिंग?

बी टाऊन
विजय तावडे
Updated Nov 29, 2021 | 12:32 IST

Sonakshai sinha : बी-टाऊनमध्ये लग्नाच्या हंगामात कतरीना कैफनंतर आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री लग्नबंधानात अडकणार असल्याची चर्चा आहे. सलमान खानच्या जवळच्या मित्रासोबत सात फेरे घेण्याची तयारी करत आहे.

This famous Bollywood actress will get marry soon
सलमान खानच्या नातेवाईकासोबत घेणार सात फेरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बी टाऊनमध्ये लग्नाचा सीझन
  • सोनाक्षी सिन्हा लवकरच बोहोल्यावर चढणार असल्याची चर्चा
  • बंटी सचदेवासोबत लग्नबंधनात अडकणार


Sonakshai sinha : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन जोरात आहे. सध्या अनेक हिरोंच्या डोक्यावर मुंडावळ्या बांधल्या जात असताना, आता हिरॉईन्सच्या दारातही वरात येऊ लागल्या आहेत. कतरिना कैफनंतर आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या तयारीत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा आहे. रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड बंटी सचदेवाशी लगीनगाठ बांधण्याच्या तयारीत आहे.


या लग्नाबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण बातमी जोरात आहे की कतरिना कैफनंतर पुढचा नंबर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा असणार आहे. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, बॉलिवूडची ही दबंग अभिनेत्री कोणाची नवरी होणार आहे. 

Sonakshi Sinha looks ravishing as she poses in THIS stunning saree- view pics | Hindi Movie News - Times of India


सलमान खानच्या अगदी जवळचा आहे बंटी सचदेवा 

बंटी सचदेवा हा सुपरस्टार सलमान खानचा भाऊ सोहेल खानचा मेहुणा आहे. तो सोहेलची पत्नी सीमा सचदेवा हिचा भाऊ आहे. त्यामुळे बंटी सचदेवा आणि सोनाक्षी सिन्हा यांचे लग्न झाले तर ती सुपरस्टार सलमान खानची नातेवाईक बनेल. सोनाक्षी सिन्हा आणि बंटी सचदेवा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण या दोन स्टार्सनी उघडपणे या नात्यावर भाष्य करणं टाळलं आहे.

बंटी सचदेवाचं दुसरं लग्न

बंटी सचदेवाचे हे पहिले लग्न नाही. बंटी सचदेवाने 2009मध्ये अंबिका चौहानशी पहिले लग्न केले होते. त्यांचे भव्य लग्न गोव्यात झाले, जे फक्त 4 वर्षे टिकले. यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. बंटी सचदेवा कॉर्नरस्टोन या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा मालक आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या वेळी ही कंपनी खूप चर्चेत होती. या कंपनीत दिशा सालियनही काम करत होती. त्यामुळे बंटी सचदेवाचे नावही त्यावेळी मीडियात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी