Taapsee Pannu old photo : नवी दिल्ली : बॉलीवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात, जे त्यांच्या चाहत्यांना पाहायला आवडतात. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो पाहून ओळखण्याचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. अशा परिस्थितीत, एका सुपरस्टार नायिकेचा फोटो पुन्हा इंटरनेटवर आला आहे, जो फोटो ओळखण्याचा प्रयत्न सुरू आहे. काहींनी या फोटोतील अभिनेत्रीला पटकन ओळखले आहे, तर काहींना मात्र, ही कोण अभिनेत्री असा प्रश्न पडला आहे.
फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगी, जिने दोन वेण्या घातल्या आहेत, ती तिच्या लहान बहिणीला तिच्या मांडीवर बसवत आहे. लहान बहिणीला मांडीवर बसवून ती हसत हसत कॅमेऱ्यासाठी पोज देत आहे. या अभिनेत्रीला ओळखले का? तुम्हाला अजूनही ओळखता येत नसेल तर मग आम्ही तुम्हाला सांगतो दोन वेण्या घातलेली ही मुलगी दुसरी कोणी नसून बॉलिवूडची सुपरस्टार तापसी पन्नू आहे. होय, या फोटोत तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिची बहीण शगुन पन्नूसोबत दिसत आहे.
तापसी पन्नू (Taapsee Pannu) केवळ हिंदी चित्रपटांमध्येच सक्रिय नाही तर ती दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक मोठी अभिनेत्री आहे. बॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तापसीने पिंक, चष्मे बद्दूर, जुडवा 2, थप्पड, बदला यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तापसी अनेकदा अभिनयाने लोकांना आश्चर्यचकित करते. तापसी पन्नू अलीकडेच ताहिर राज भसीन सोबत लूप लपेटा मध्ये दिसली होती. शाबाश मिठू हा तिचा आगामी चित्रपट आहे.