सैफ-करीनाच्या दुसऱ्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी या कारणामुळे होतोय उशीर

बी टाऊन
Updated Feb 26, 2021 | 14:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून चांगलीच चर्चा रंगली आहे. यातच बामती येतेय की मुलाचे नाव फायनल करण्यासाठी आजी शर्मिला टागोरमुळे उशीर होत आहे. 

saif-kareena
सैफ-करीनाच्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी या कारणामुळे होतोय उशीर 

थोडं पण कामाचं

  • मुलाच्या जन्मानंतर त्याचे नाव काय असावे यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.
  • सैफची आई शर्मिला टागोर अद्याप आपल्या नातवाला भेटू शकलेली नाही.
  • शर्मिला अद्याप मुंबईला आलेल्या नाहीत. याच कारणामुळे बाळाचे नाव ठेवण्यात उशीर होत आहे. 

मुंबई: सैफ अली खान(saif ali khan) आणि करीना कपूर(kareena kapoor) नुकतेच दुसऱ्या बाळाचे आई-बाबा बनलेत. काही दिवसांपूर्वी करिनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर त्याचे नाव काय असावे यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर तैमूरच्या छोट्या भावाच्या नावासाठी अनेक जण सल्ले देत आहेत. यातच एक माहिती समोर आली आहे की अखेर नाव ठेवण्याबाबत इतका उशीर का होत आहे. सैफला जेव्हा मुलाच्या नावाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, अद्याप कोणतेही नाव फायनल करण्यात आलेले नाही. आई आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली आहे. 

दरम्यान, त्यातच अशी बातमी समोर येत आहे की सैफची आई शर्मिला टागोर अद्याप आपल्या नातवाला भेटू शकलेली नाही. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार शर्मिला सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि कोरोनामुळे त्या दिल्ली येथून मुंबईला प्रवास करू शकत नाही आहेत. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की सैफ आणि करीना यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव शर्मिला आणि करिनाची आई बबिता ठेवतील. मात्र शर्मिला अद्याप मुंबईला आलेल्या नाहीत. याच कारणामुळे बाळाचे नाव ठेवण्यात उशीर होत आहे. 

करिनाने सिझेरियन डिलीव्हरीद्ववारे दुसऱ्या मुलाला जन्म दिला. बाळाच्या आगमनाआधीच सैफ आणि करीनाने दुसरे नवे घरही घेतले होते. या घरात काही दिवसांपूर्वीच हे जोडपे शिफ्ट झाले. सैफने करिनाची काळजी घेण्यासाठी शूटिंगच्या आधी पॅटर्निटी लीव्हही घेतली होती. सैफ पूर्णपणे करिनाची काळजी घेत होता. 

pic

नुकतेच तैमूरचे आजोबा रणधीर कपूर यांनी मुलाखतीदरम्यान यावर भाष्य केले. ई. टाईम्सने रणधीर कपूर यांना विचारले की अखेर त्यांच्या कुटुंबात आलेला हा नवा पाहुणा कोणासारखा दिसतो. तो सैफसारखा दिसतो की करिनासारखा?

kareena baby

रणधीर कपूर यांनी यावर उत्तर देताना म्हटले की, मी अद्याप छोट्या बाळाला भेटलेलो नाही. मला वाटतं की सगळी लहान मुले एकसारखीच दिसतात. मात्र करिनाच्या जवळ असलेल्या लोकांनी सांगितले की हा नवा पाहुणा एकदम आपल्या मोठ्या भावासारखा तैमूरसारखा दिसतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी