Tillotama Shome : दिल्ली क्राईम सीझन 2 मध्ये लता सोळंकीची भूमिका निभावणारी 'ही' अभिनेत्री आहे जया बच्चनची सून

बी टाऊन
Updated Aug 27, 2022 | 17:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Delhi Crime 2 fame Tillotama Shome : नेटफ्लिक्सवर दिल्ली क्राईम (Delhi Crime)या वेबसीरिजचा दुसरा सीझन रिलीज झाला आहे. या सीझनमध्ये तिलोतमा शोमने (Tillotama Shome) एका दमदार खलनायिकेची भूमिका साकारली आहे. या वेबसीरिजमधील तिच्या कामाचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. अशी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांची सून असल्याचे म्हटले जात आहे.

Tillotama Shome Delhi crime 2 Jaya bachachan connection
दिल्ली क्राईममध्ये तिल्लोतमा शोमचा दमदार अभिनय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिल्ली क्राइम या वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे.
  • पुन्हा एकदा शेफाली शाह डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे
  • वेबसीरिजमध्ये तिलोतमा शोमने दमदार खलनायिकेची भूमिका साकारली आहे.

Delhi Crime 2 fame Tillotama Shome : नेटफ्लिक्सवर दिल्ली क्राईम (Delhi Crime) या वेबसीरिजचा दुसरा सीझन रिलीज झाला आहे. या सीझनमध्ये तिलोतमा शोमने (Tillotama Shome) एका दमदार खलनायिकेची भूमिका साकारली आहे. या वेबसीरिजमधील तिच्या कामाचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. अशी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांची सून असल्याचे म्हटले जात आहे. 


 Who is Tillotama Shome: सध्या नेटफ्लिक्सवर दिल्ली क्राईमचा सीझन 2 खूपच धुमाकूळ घालत आहे. 2019 मध्ये आलेल्या या वेबसीरिजचा पहिला सीझन दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकारणावर आधारित होता. तर दुसरा सीझनची कथा सीरियल किलरवर आधारित आहे. या सीझनमध्येही शेफाली शाह डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या
भूमिकेत दिसत आहे. शेफाली शाहसह रसिका दुगल, राजेश तैलंग, अभिनेते आदिल हुसैन, अनुराग अरोरा, सिद्धार्थ भारद्वाज आणि गोपाल दत्त यांच्याही भूमिका आहेतच. 

अधिक वाचा : अशी आहे रणबीर कपूर-आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र'ची स्टोरी?

मात्र, यंदाच्या सीझनचं वैशिष्ट्य म्हणजे तिल्लोतमा शोम ही अभिनेत्री. तिलोत्तमा शोमने खलनायिकेची दमादार भूमिका साकारली आहे. रांगडा लूक असलेल्या प्रमुख खलिनायकांपैकी एक अशी ही भूमिका आहे. त्यांनी साकारलेली खलनायिका एक त्यांच्यातल्या अभिनेत्रीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. स्वत:चं अभिनय कौशल्य त्यांनी  सिद्ध केलं आहे, आणि प्रेक्षकांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. 

मीरा नायरच्या मान्सून वेडिंग या सिनेमातून तिलोतमा शोमने पदार्पण केले.यानंतर त्यांनी इंग्रजी, बंगाली, हिंदी, नेपाळी, पंजाबी आणि जर्मन भाषेतील सिनेमांमध्ये काम केलं. 
आपल्या भूमिकेचा सखोल अभ्यास करणं ही त्यांची खासियत आहे. तिलोतमा शोमला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी यूके आशियाई चित्रपट महोत्सवाच्या न्यू एडिशनमध्ये
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. 'राहगीर: द वेफेरर्स'साठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. इंग्रजी, बंगाली आणि हिंदी सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये त्यांनी काम केलेलं आहे.
 
कोलकात्यातील सोम लेडी श्री राम कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्ये शिकत असताना अरविंद गौर यांच्या थिएटर ग्रुपमध्ये त्या सामील झाल्या. यानंतर त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. 47 व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये या सीरिजला उत्कृष्ट  सीरिजचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रिची मेहता निर्मित 'दिल्ली क्राईम 2' चे दिग्दर्शन तनुज चोप्रा यांनी केले आहे. तिलोतमा शोम यांनी हिंदीत आत्मा, सर, चिंटू का बर्थडे यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले. इरफान खानसोबतही तिलोत्तमा शोम यांनी काम केले होते. हिंदी मिडियम आणि अंग्रेजी मीडियमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. 

अधिक वाचा : 'या' वेबसीरिजमधून सुबोध भावेचे ओटीटवर पदार्पण

Qissa मध्ये पुरुष व्यक्तिरेखा साकारली होती


तिलोतमा शोमने किस्सा - द टेल ऑफ अ लोनली घोस्ट (Qissa: The Tale of a Lonely Ghost) या पंजाबी चित्रपटातही काम केले. 1947 च्या फाळणीच्या एका अनोख्या कथेवर आधारित, या सिनेमात इरफान खान, टिस्का चोप्रा, सोनिया बिंद्रा, राधिका दुग्गल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमात त्यांनी पुरुष व्यक्तिरेखा साकारली होती
या सिनेमात त्यांनी  इरफान आणि टिस्काची चोप्राच्या मुलीच्या भूमिकेत दिसल्या.या आव्हानात्मक भूमिकेसाठी तिलोत्तमा शोम यांना अबू धाबी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी