[VIDEO] जन्माष्टमीनिमित्त हेमा मालिनी यांनी गायलं गाणं

बी टाऊन
Updated Aug 23, 2019 | 21:01 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

हेमा मालिनी यांच्या फॅन्ससाठी खूशखबर आहे. हेमा मालिनी यांचं नवं गाणं तुमच्या भेटीला आलं आहे. हेमा मालिनी यांनी चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. हेमा मालिनी यांनी कृष्णाच्या दोन अल्बममध्ये गाणं गायलं आहे.

hima malini
[VIDEO] जन्माष्टमीनिमित्त हेमा मालिनी यांचं खास गाणं रिलीज 

थोडं पण कामाचं

  • हेमा मालिनी यांच्या फॅन्ससाठी खूशखबर आहे.
  • हेमा मालिनी यांचं नवं गाणं तुमच्या भेटीला आलं आहे.
  • हेमा मालिनी यांनी चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे.

बॉलिवूडमध्ये ड्रीम गर्ल म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी यांनी बऱ्याच हिट सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर राजकारणात उडी घेत हेमा मालिनी यांची खासदारपदी निवड झाली. मथुराच्या लोकसभा मतदारसंघातून हेमा मालिनी या दुसऱ्यांदा निवडणून आल्या. आता मात्र हेमा मालिनी यांच्या फॅन्ससाठी खूशखबर आहे. हेमा मालिनी यांचं नवं गाणं तुमच्या भेटीला आलं आहे. हेमा मालिनी यांनी चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. या जन्माष्टमीच्या निमित्तानं हेमा मालिनी यांच्या सर्वच चाहत्यांना सरप्राईज मिळणार आहे. त्याच कारणंही तसं खास आहे. हेमा मालिनी यांनी कृष्णाच्या दोन अल्बममध्ये गाणं गायलं आहे. 

टाइम्स म्युझिकचा विशेष प्रकाशन ‘कृष्णा मंत्र’ आणि ‘कृष्णा महामंत्र’ या दोन कृष्णाच्या अल्बममध्ये हेमा मालिनी यांनी गाणं गायलं आहे.  विवेक प्रकाश यांनी या अल्बमची निर्मिती केली आहे तर दास नारायण (नारायण अग्रवाल)  यांनी हे गाणं लिहिलं आहे. 

यापूर्वी टाइम्स म्युझिकबरोबर हेमा मालिनीनं 'सौंदर्या लहरी' ('Soundarya Lahari') या नावाच्या अल्बमद्वारे गायनाची सुरूवात केली. हेमा मालिनी एक डान्सर आहेत, त्याचसोबत अभिनेत्रीसह त्या एक सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. त्या आपल्या प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देतात. 

हेमा मालिनी या कृष्णभक्त आहेत आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हे अल्बम रिलीज होत आहेत. टाइम्स म्युझिक अध्यात्माचे यूट्युब चॅनेलवर हे ४ मिनिटांचं गाणं पाहता येईल. सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर,  ५०  मिनिटांच्या गाण्यांची आवृत्ती ध्यान आणि जपसाठी उपलब्ध असेल.

मला नेहमीच अध्यात्म आणि मन: शांती मिळाली आहे. जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर, हा एक चांगला अनुभव होता. प्रत्येकजण गाणं ऐकत असताना समान देवत्व अनुभवेल अशी आशा करते, असं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे. 

‘कृष्ण मंत्र’ आणि ‘कृष्णा महामंत्र’ हे टाइम्स म्युझिकचे विशेष प्रकाशन आहे आणि ते टाइम्स म्युझिक अध्यात्म यूट्यूब चॅनलवर पाहण्यास / ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...