Nusrat Jahan Birthday: नुसरत जहाँ 70 लाखांची कार आणि एक कोटीच्या घराची मालकीण, संपत्ती पाहून येईल चक्कर

बी टाऊन
Updated Jan 08, 2022 | 18:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

TMC MP and Actress Nusrat Jahan Net Worth: बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ आज तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे.अलीकडेच नुसरत जहाँने एका मुलाला जन्म दिला आहे, ज्याच्या वडिलांच्या नावावरून बराच वाद झाला होता.

TMC MP and Actress Nusrat Jahan Net Worth
नुसरत जहाँची संपत्ती पाहून डोळे चक्रावतील  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नुसरत जहाँ आज (८ जानेवारी) तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
  • नुसरत जहाँ बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत.
  • नुसरत खासदार झाल्यापासून वादांना तोंड देत आहे.

TMC MP and Actress Nusrat Jahan Net Worth: बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ आज तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहेत. 
अलीकडेच नुसरत जहाँने एका मुलाला जन्म दिला आहे, ज्याच्या वडिलांच्या नावावरून बराच वाद झाला होता. नुसरत तिचा पती निखिल जैनपासून वेगळी राहत होती, तिच्या पतीने हे मूल आपले नसल्याचे सांगितले होते. हे मूल बंगाली अभिनेता आणि भाजप नेते यशदास गुप्ता यांचे असल्याची बातमी समोर आली होती.

नुसरत जहाँने 2011 मध्ये शोत्रू या बंगाली चित्रपटातून पदार्पण केले आणि त्यानंतर ती पडद्यावर स्थिरावली. आतापर्यंत तिने दोन डझन चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक पुरस्कार जिंकले आहेत. नुसरत जहाँने 2010 साली सौंदर्य स्पर्धा जिंकून तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली. तिने 'खोखा 420', 'खिलाडी' आणि 'सोंधे नामर आगाया' सारख्या चित्रपटात काम केले आहे.

नुसरत जहाँच्या फीबद्दल बोलायचे तर ती 5 लाख रुपये बिझनेस फी घेते. त्याचबरोबर नुसरत ज्या घरात राहते त्या घराची किंमत 95 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. 
तिच्याकडे सुमारे 12 लाख रुपये किमतीचे 450 ग्रॅम सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने आहेत. तसंच BMW 5 सीरिज आणि 70 लाख रुपयांची फोर्ड एंडेव्हर कारची ती मालकीण आहे. 2019 मध्ये निवडणूक आयोगासमोर उमेदवारी अर्ज भरताना, नुसरतने तिच्या संपत्तीच्या तपशील दिला होता. यामध्ये तिची जंगम मालमत्ता 90.9 लाख रुपये आहे, तर स्थावर मालमत्ता 2 कोटी रुपये, अशी एकूण 2.90 कोटींची संपत्ती आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ या ना त्या कारणाने चर्चेत असतात. खासदार झाल्यापासून ती चर्चेत आहे, असे म्हणता येईल. खासदार झाल्यानंतर शपथ घेण्यासाठी संसदेत पोहोचलेली नुसरत साडी आणि मंगळसूत्र घालून दिसली, त्यानंतर मुस्लिम धर्मगुरूंनी तिच्यावर टीका केली. यानंतर नुसरतला हनीमूनला शॉर्ट ड्रेस परिधान केलेल्या फोटोंमुळे ट्रोलही व्हावे लागले होते. मात्र, नुसरतला या गोष्टींचा काहीएक फरक पडला नाही.

नुसरत जहाँने 19 जून 2019 रोजी कोलकाता येथील बिझनेसमन निखिल जैनसोबत लग्न केले. तुर्कीच्या इस्तंबूल शहरात दोन प्रकारच्या रितीरिवाजांनी हा विवाह पार  पडला.आधी त्यांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले आणि नंतर ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार एकमेकांना कॉम्रेड म्हणून निवडले, परंतु आता दोघेही वेगळे राहत आहेत. नुसरतने हा विवाह अवैध असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी