Navya Naveli Nanda : बिग बी अमिताभ बच्चन यांनी नात कुणाला करतेय डेट? नव्या नवेलीचे फोटो व्हायरल

बी टाऊन
Updated Jan 21, 2022 | 15:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Navya Naveli Nanda Photo: बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Grand Daughter Navya Naveli Nanda) ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. यावेळी काही व्हायरल फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे. नक्की काय आहे या मागचं कारण पाहुया.

To Whom Big B Amitabh Bachchan granddaughter is dating? photo viral
बिग बींची नात सिद्धांत चतुर्वेदीला करतेय डेट?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कुणाला डेट करतेय 'अमिताभ बच्चन यांची नात'?
  • नव्या नवेली नंदाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
  • सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली रिलेशनशीपमध्ये ?

Navya Naveli Nanda Photo: बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Grand Daughter Navya Naveli Nanda) ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिने पोस्ट केलेले व्हिडिओ, तिच्या पोस्टला चाहते नेहमीच लाईक करतात. चाहत्यांची कायम पसंती मिळते. कौन बनेगा करोडपतीच्या 1000 व्या एपिसोडमध्ये नव्या नवेलीने ( Navya Naveli Nanda) तिच्या आईसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओलाही चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. यावेळीही ती चर्चेत येण्याचं कारण आहे एक फोटो. नव्या नवेलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती एका बॉलिवूड अभिनेत्याला डेट करताना दिसत आहे. आताही ती चर्चेत आली आहे एका फोटोवरुन. ती बॉलीवूडमधल्या अभिनेत्याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. 

नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला (Sidhant Chaturvedi) डेट करत असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत आहे. तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंमुळेच चर्चांना उधाण आले आहे. नव्या नवेलीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सही दिल्या आहेत. काही युजर्सनी तिचं कौतुक केलं आहे. तर एका युजरने म्हटलं आहे, मला असं वाटतं सध्या नव्या नवेली ही सिद्धांतच्या (Sidhant Chaturvedi) प्रेमात आहे. 


तर दुसरीकडे, सिद्धांत आणि दीपिकाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यामध्ये दीपिका - सिद्धांत इंटिमेट होत असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यावरुन दीपिकाला आणि सिद्धांतला ट्रोल करण्यात आले होते. दीपिकानं (Deepika padukone ) देखील नव्या नवेलीच्या फोटोवर कमेंट केली आहे. तिनं म्हटलं आहे की, ब्युटी...याशिवाय संजय कपूरची ( Sanjay Kapoor )पत्नी महिपनं देखील एक इमोजी शेयर केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी