चाळीशीची झाली करिना

Today is 21st September Kareena Kapoor Khan Birthday अभिनेत्री करिना कपूर खान चाळीशी सेलिब्रेट करत आहे.

Today is 21st September Kareena Kapoor Khan Birthday
चाळीशीची झाली करिना 

थोडं पण कामाचं

  • चाळीशीची झाली करिना
  • कधी अभिनयामुळे तर कधी फॅशन शोमधील रॅम्प वॉकमुळे तसेच झिरो फिगरमुळे करिना कायम चर्चेत
  • लवकरच करिना आमिर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा’ सिनेमात दिसणार करिना

मुंबईः अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आज (सोमवार) चाळीशी सेलिब्रेट करत आहे. करिनाचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी झाला (Kareena's Birthdate). गुटगुटीत बेबो (Bebo) ते झिरो फिगर (Zero Figure) करिना असा भन्नाट प्रवास करिनाने केला. तिच्या या प्रवासात ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) या मराठमोळ्या डाएटिशिअनची (dietician) महत्त्वाची भूमिका होती. 

करिनाने वाढदिवसासाठी आधीपासूनच तयारी सुरू केली. ही तयारी सुरू असताना तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात ती म्हणते... 'चाळीशी साजरी करतेय, पुन्हा एक शांतपणे बसून आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे... व्यक्त होणे, प्रेम करणे, हसणे, माफ करणे, विसरून जाणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रार्थना करणे हे सगळे करण्याची इच्छा आहे. मला आयुष्यातील पुढच्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य मिळो अशी प्रार्थना करते. आजवर मिळवलेला अनुभव आणि निर्णय यासाठी सर्वोच्च अनादी अनंत शक्तीचे आभार मानले. काही योग्य, काही अयोग्य, काही श्रेष्ठ तर काही महत्त्व नसलेले किरकोळ... असे ४० वर्षांत अनेक अनुभव मिळवले.' चाळीशीच्या अनुभवांचे महत्त्व करिनाने अधोरेखीत केले. 

कपूर घराण्यातील लाडकी मुलगी आणि करिश्मा कपूरची धाकटी बहीण असलेल्या करिनाने अल्पावधीत कामगिरीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे असे स्वतंत्र स्थान निर्माण केले. अभिषेक बच्चन सोबत करिनाने रेफ्युजी सिनेमा करत बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या सिनेमाने जेमतेम कामगिरी केली. पण पुढच्या वर्षी मुझे कुछ कहना है हा सिनेमा सुपरहिट झाला. नंतर पुन्हा काही यथातथा सिनेमांनंतर कभी खुशी कभी गम या ब्लॉकबस्टर सिनेमात करिना दिसली. बजरंगी भाईजान आणि सिंघम रिटर्न या दोन ब्लॉकबस्टर सिनेमांमुळे करिनाच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान आणि सैफ अली खान यांच्यासोबत काम केलेल्या करिनाने १६ ऑक्टोबर २०१२ रोजी सैफ अली खानसोबत लग्न केले. सैफसोबत लग्न केल्यानंतरही करिना निवडक सिनेमांमध्ये दिसली. 

कधी अभिनयामुळे तर कधी फॅशन शोमधील रॅम्प वॉकमुळे तसेच झिरो फिगरमुळे करिना कायम चर्चेत राहिली आहे. करिनाच्या फिटनेसची प्रसार माध्यमांमध्ये तसेच सोशल मीडियावर आजही क्रेझ आहे. पहिल्यांदा गरोदर असताना एका फॅशन शोमध्ये मॉडेल म्हणून सहभागी झाल्यामुळे करिनाची प्रचंड चर्चा झाली. प्रसार माध्यमांमध्ये तसेच सोशल मीडियावर करिना प्रमाणेच तिच पहिले मूल तैमूर याचीही प्रचंड चर्चा असते. आता करिना दुसऱ्यांदा गरोदर आहे. अभिनयासह आईची जबाबदारी करिना चोख पार पाडेल असा विश्वास तिचे चाहते व्यक्त करत आहेत. 

लवकरच करिना आमिर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा’ सिनेमात दिसणार आहे. या व्यतिरिक्त करण जोहरच्या तख्त या ऐतिहासिक संदर्भ असलेल्या सिनेमातही करिना दिसेल. 

कोरोना संकटात स्वच्छता राखा असे सांगत करिनाने सैफ अली खानसोबत एक जाहिरात केली. ही जाहिरात आजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सतत वेगळं काही तरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या करिनाने २०१६ मध्ये 'कि अँड का' हा सिनेमा केला होता. यात पती घर सांभाळतो आणि पत्नी घरासाठी पैसे कमावते असे दाखवले आहे. या वेगळ्या धाटणीच्या सिनेमातील करिनाच्या भूमिकेचे कौतुक झाले. चाळीशीची करिना आता अनुभवसंपन्न झाली आहे. या अनुभवांच्या जोरावर भविष्यात अभिनयाच्या क्षेत्रात ती आणखी उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास करिनाचे चाहते व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी