Top 10 web series: ओटीटीवर 'या' 3 वेबसीरिजची जादू, प्रेक्षकांची जिंकली मनं

बी टाऊन
Updated Oct 06, 2022 | 14:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Top on OTT : सध्या ओटीटीवर महिलांवर आधारित वेबसीरिज (Web series on OTT) प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, यात हॉलिवूड वेबसीरिजला मागे टाकत एका भारतीय वेबसीरिजने बाजी मारली आहे. दहनः राखन का रहस्य ही वेबसीरिज Ormax मीडियाने प्रसिद्ध केलेल्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

top 10 web series on OTT by ormax media survey
'या' वेबसीरिजची ओटीटीवर जादू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जाणून घ्या ओटीटीवरील टॉप 10 वेबसीरिज
  • जगभरात या 2 वेबसीरिजची ओटीटीवर जादू
  • हॉलिवूड वेबसीरिजला मागे टाकत पटकावलं अव्वल स्थान

Top webseries on OTT : सध्या थिएटरमध्ये 'पोनियिन सेल्वन 1' (PS 1) प्रेक्षकांची मनं जिंकत आहे, तर काहीजण वेबसीरिजला (Web series on OTT)  प्राधान्य देत आहेत. सध्या काही काल्पनिक आणि बजेट वेबसीरिज ओटीटीवर धुमाकूळ घालत आहेत. अनेक बिग बजेट, मोठे सिनेमा ओटीटीवर रिलीज झाले आहेत. Ormax मीडियाने गेल्या आठवड्यात भारतात कोणत्या वेबसीरिजला प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली याची यादी प्रसिद्ध केली आहे. चला तर मग जाणून घेऊया भागतीय प्रेक्षकांनी कोणाला पसंती दिली आहे ते. (top 10 web series on OTT by ormax media survey)

जगभरात या दोन वेबसीरिजचा बोलबाला

द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिंग्ज ऑफ पॉवर'  (The Lord Of The Rings-the Rings Of Power) आणि 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' (House of the Dragon) या दोन वेबसीरिजचा जगभरात बोलबाला आहे. ओटीटीवर या दोन्ही वेबसीरिज एकमेकांना टक्कर देत आहे. या दोन वेबसीरिजना प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. त्याचप्रमाणे, मार्वलच्या 'शी हल्क'लाही प्रेक्षक पसंत करत आहेत. या वेबसीरिजचा दर आठवड्याला एक एपिसोड रिलीज होत आहे. असं सगळं असलं तरी एका भारतीय वेबसीरिजने हॉलिवूडच्या वेबसीरिजना मागे टाकलं आहे. 

अधिक वाचा : श्वास घेण्याची पद्धत बदला, आयुुष्य बदलेल!

दहनः राखन का रहस्य

भारतात 'दहन' या वेबसीरिजने'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज-द रिंग्ज ऑफ पॉवर' (The Lord Of The Rings-the Rings Of Power) आणि 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' (House of the Dragon) याला मागे टाकले आहे. दहन ही वेबसीरिज नंबर एकवर आहे. या वेबसीरिजबद्दल सांगायचे तर, जर तुम्हाला भयपट, रहस्य, साहस, भूत, जादू, चेटूक, गूढ कथा आवडत असतलील तर तुम्हाला ही वेबसीरिज आवडेल. डिस्ने हॉटस्टारवर दहन ही वेबसीरिज रिलीज झालेली आहे. सुमारे 45ते 50 मिनिटांचे असे 9 एपिसोड्स आहेत. भारतात ही वेबसीरिज नंबर 1 वर आहे. 

द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिंग्स ऑफ पावर

ही वेबसीरिज आतापर्यंतची सर्वात महागडी वेबसीरिज असल्याचं म्हटल जात आहे. ही वेबसीरिज भारतातील प्रेक्षकांना खूप आवडते. लिस्टमध्ये द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिंग्स ऑफ पावर (The Lord Of The Rings-the Rings Of Power) दुसऱ्या नंबरवर आहे. या वेबसीरिजची गोष्ट थोडी वेगळी आहे. या कथेत व्हॅलिनोर ही देवांची भूमी आहे जिथे मानव जाऊ शकत नाही. कथा  सॉरॉन (en:Sauron) नावाच्या राक्षसी काळ्या राक्षसापासून सुरू होते जो काळ्या जादूमध्ये पारंगत आहे. पहिल्या युगाच्या शेवटी, सॉरॉन त्याचा राक्षसी गुरु मॉर्गोथ मेलकोरला देवतांच्या पराभवापासून बचावतो. आता देव आणि मानव राक्षसाविरोधात एकत्र लढत आहेत. या वेबसीरिजचा नवीन एपिसोड दर शुक्रवारी रिलीज होतो. हा  द लॉर्ड ऑफ़ द रिंग्स--द फ़ॅलोशिप ऑफ़ द रिंग, द लॉर्ड ऑफ़ द रिंग्स--द टू टॉवर्स आणि द लॉर्ड ऑफ़ द रिंग्स--द रिटर्न ऑफ़ द किंग या वेबसीरिजचा प्रीक्वेल आहे. 


'हाउस ऑफ द ड्रॅगन'


HBO ची सर्वात लोकप्रिय सीरिज 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' (House of the Dragon) या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या 'गेम ऑफ थ्रोन्स' या वेबसीरिजचा हा प्रीक्वल आहे. त्याचा पहिला भाग 22 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाला. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक हा एचबीओ शो पाहू शकतात. त्याचा नवीन भाग दर सोमवारी रिलीज होतो.

अधिक वाचा : Bigg Boss: घरामध्ये प्रसादला सारखं केलं जातंय टार्गेट?


टॉप 10 वेबसीरिजची यादी

यादीत चौथ्या क्रमांकावर 'जमतारा', पाचव्या क्रमांकावर 'हुश हुश', सहाव्या क्रमांकावर 'शी हल्क', सातव्या क्रमांकावर 'बबली बाउन्सर', ९व्या क्रमांकावर 'पपेट', १०व्या क्रमांकावर 'क्रिमिनल जस्टिस: अधूरा सच' आणि 'कॉलेज रोमान्स' यांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी