Gangster Web Series: गुन्हेगारी जगताचे निर्भय सत्य दाखवते गॅंगस्टरच्या जीवनावर बनलेल्या या वेब सिरीज

बी टाऊन
Updated Apr 16, 2023 | 17:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Crime Web Series: चित्रपटाच्या पडद्यावर आतापर्यंत गँगवॉर ते गँगस्टर आणि त्यांच्या गुन्ह्यांवर अनेक चित्रपट आणि वेब सिरीज बनवण्यात आल्या असून त्यात ‘मिर्झापूर’ मालिकेचे नाव अग्रस्थानी येते. आज आम्ही तुम्हाला हिंदीत बनवलेल्या अशाच 5 क्राईम थ्रिलर वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत

 गॅंगस्टरच्या जीवनावर बनलेली वेब सिरीज
Top 5 Gangster Crime thriller Web Series  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • आत्तापर्यंत फक्त चित्रपटाच्या पडद्यावर एनकाउंटर पाहिला असेल
  • चित्रपटाच्या पडद्यावर गोळ्यांचा पाऊस आणि रक्तपात पाहून लोकांना आनंद होतो
  • या वेब सिरीज पाहिल्यानंतर तुमचे मन पूर्णपणे सुन्न होईल.

Gangster Web Series: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी 15 एप्रिलच्या रात्री अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आश्चर्य म्हणजे ही घटना पोलिसांच्या उपस्थितीत पार पडली. या घटनेने सर्वांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहे. सर्व काही असे घडले की जणू एखाद्या चित्रपटाच्या दृश्याचे शूटिंग चालू आहे. (Top 5 Gangster Crime thriller Web Series)

आत्तापर्यंत फक्त चित्रपटाच्या पडद्यावर किंवा ओटीटीच्या दुनियेत एखाद्या बदमाश किंवा गुंडाला अशा प्रकारे मारले गेल्याचे दिसले होते. पण प्रत्यक्षात पाहिल्यावर सर्वांनाच धक्का बसला. चित्रपटाच्या पडद्यावर गोळ्यांचा पाऊस आणि रक्तपात पाहून लोकांना आनंद होत असला तरी वास्तविक जीवन असे नाही.

अधिक वाचा: Femina Miss India 2023 Winner: दिल्लीची श्रेया पूजा ठरली उपविजेती, सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव

चित्रपटाच्या पडद्यावर आतापर्यंत गँगवॉर ते गँगस्टर आणि त्यांच्या गुन्ह्यांवर अनेक चित्रपट आणि वेब सिरीज बनवण्यात आल्या असून त्यात ‘मिर्झापूर’ मालिकेचे नाव अग्रस्थानी येते. आज आम्ही तुम्हाला हिंदीत बनवलेल्या अशाच 5 क्राईम थ्रिलर वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत, ज्यांची कथा गँगस्टर, गॅंग वॉर एक्सटॉर्शनवर आधारित होती. या वेब सिरीज पाहिल्यानंतर तुमचे मन पूर्णपणे सुन्न होईल.

1. मिर्झापूर

सर्वप्रथम, सर्वात लोकप्रिय क्राईम थ्रिलर वेब सिरीज 'मिर्झापूर'पासून सुरुवात करूया, ज्याचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून तिसर्‍या सीझनची वाट पाहत आहेत. या वेब सिरीजची कथा उत्तर प्रदेशातील माफिया राजवर आधारित आहे. पहिल्या सीझनमध्ये मिर्झापूरच्या गादीवर कालेन भैय्या (पंकज त्रिपाठी)चा अंमल दाखवला होता.

कालेन भैय्यासोबत त्यांचा मुलगा मुन्नाही सर्वत्र गुंडगिरी करताना दिसत होता. 'मिर्झापूर'चा पहिला सीझन चांगलाच गाजला, त्यानंतर दुसऱ्या सीझननेही दहशत निर्माण केली. गुड्डू भैय्याच्या भूमिकेत अली फजल पूर्णपणे तल्लीन झाला होता. दुसऱ्या सीझनमध्ये, गुड्डू भैया आणि गोलू स्वतःचा बदला घेण्याची स्पर्धा करताना दिसले. ही वेब सिरीज प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

2. दहनम

'दहनम'चे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते. या वेब सिरीजचे सर्व भाग MX Player वर कधीही विनामूल्य पाहता येतील. 'दहनम'ची कथा खऱ्या नक्षलवादी घटनेवर आधारित आहे. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या एका मुलाची ही कथा आहे. कथेतील ट्विस्ट आणि टर्न्स 'दहनम'मध्ये सस्पेन्स निर्माण करतात. त्यात ईशा कोप्पीकरही दिसली होती. या वेब सिरीजची कथा एका गावातून सुरू होते जिथे फक्त जमीनदारांचे राज्य होते. 

अधिक वाचा: Actor Car Fire : सिनेमा आणि टीव्ही मालिकांतून चमकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारला आग

3. शिकारी

ही एक अ‍ॅक्शन आणि क्राइम थ्रिलर वेब सिरीज असून त्यात भरपूर मसाला, थ्रिल, अॅक्शन आणि गुन्हेगारी दाखवण्यात आली आहे. कथा तीन मित्रांची आहे, जे एकत्र जीवनाचा प्रत्येक प्रकारे आनंद घेतात आणि अनेक मोठे घोटाळे देखील करतात. या वेब सिरीजचे दोन सीझन आले आहेत. ते 'चौपाल ओरिजिनल' प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. याला IMDb वर 10 पैकी 7.3 रेटिंग मिळाले आहे, तर त्याच्या दोन भागांचे रेटिंग 9.9 आहे. 'शिकारी'मध्ये सुखविंदर चहल, गुग्गु गिल आणि आशिष दुग्गल यांच्या भूमिका आहेत.

4. भौकाल 2

ही MX Player ची सर्वात लोकप्रिय क्राइम थ्रिलर वेब सिरीज आहे. त्यात मोहित रैना दिसला होता. या वेब सिरीजची कथा उत्तर प्रदेशातील एन्काउंटर स्पेशालिस्ट नवनीत सिक्केरा यांच्यावर आधारित आहे. नवनीत सिक्केरा मुझफ्फरनगर आणि कुशीनगरमध्ये एसएसपी म्हणून तैनात असताना तेथे गुंड आणि बदमाशांची अवस्था बिकट झाली होती. नवनीत सिक्केरा यांनी 60 हून अधिक चकमकी केल्या आहेत. त्याची कथा 'भौकाल'मध्ये दाखवण्यात आली होती. या वेब सीरिजची कथा मुझफ्फरपूरपासून सुरू होते.  या वेब सिरीजमध्ये एक पोलिस अधिकारी पोलिसांची नकारात्मक प्रतिमा कशी बदलण्याचा प्रयत्न करतो हे दाखवण्यात आले होते. 'भौकाल' वेब सिरीजचे दोन सीझन आले आणि दोन्ही ब्लॉकबस्टर ठरले. यात मोहित रैना व्यतिरिक्त अभिमन्यू सिंग आणि सिद्धांत कपूर दिसले होते.

अधिक वाचा:  Priyanka Chopra-Nick Jonas लंडनच्या रस्त्यावर झाले रोमँटिक, लिप लॉक सीनचे फोटो व्हायरल

5. मर्डर इन कोर्टरूम

या वेब सिरीजची कथा 2004 मध्ये घडलेल्या घटनेवर आधारित आहे, जेव्हा शंभरहून अधिक महिलांनी नागपुरातील कोर्टरूममध्ये घुसून अक्कू यादवची निर्घृण हत्या केली होती. अक्कू यादव म्हणजेच भरत कालीचरण याला पोलिसांनी न्यायालयात हजर करण्यासाठी नेले होते. तेव्हाच शेकडो महिला हातात धारदार शस्त्रे घेऊन तेथे पोहोचल्या आणि त्यांनी अक्कू यादवची हत्या केली. अक्कू यादववर सीरियल किलिंग ते सीरियल रेपिस्ट, हल्ला आणि खंडणीचे आरोप होते. अक्कू यादवसोबत घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. हीच घटना नेटफ्लिक्सच्या 'मर्डर इन अ कोर्ट रूम' या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आली होती. ही एक माहितीपट मालिका आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी