रेप करणं बंद करा, ओरडली कान्समध्ये रेड कार्पेटवर आलेली टॉपलेस महिला

Topless woman protests Ukraine sexual violence on Cannes red carpet : ७५व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर एक टॉपलेस महिला आली. या महिलेने आमच्यावर रेप करणे बंद करा असे ओरडण्यास सुरुवात केली.

Topless woman protests Ukraine sexual violence on Cannes red carpet
रेप करणं बंद करा, ओरडली कान्समध्ये रेड कार्पेटवर आलेली टॉपलेस महिला 
थोडं पण कामाचं
  • रेप करणं बंद करा, ओरडली कान्समध्ये रेड कार्पेटवर आलेली टॉपलेस महिला
  • ७५व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर घडली घटना
  • सुरक्षा रक्षकांनी महिलेला रेड कार्पेटवरून दूर नेले

Topless woman protests Ukraine sexual violence on Cannes red carpet : ७५व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर एक टॉपलेस महिला आली. या महिलेने आमच्यावर रेप करणे बंद करा असे ओरडण्यास सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांनी घेराव घालून या महिलेच्या अंगावर एक जॅकेट घातले. यानंतर ओरडणाऱ्याला महिलेला पकडून रेड कार्पेटवरून दूर करण्यात आले.

हॉलिवूड कलाकार टिल्डा स्विंटन आणि इदरीस एल्बा 'थ्री थाउजंड इअर्स ऑफ लॉन्गिंग' या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी रेड कार्पेटवर आले. मीडियाचे प्रतिनिधी टिल्डा आणि इदरीसचे फोटो काढत होते. हे फोटो सेशन सुरूअसताना एक टॉपलेस महिला रेड कार्पेटवर आली आणि ओरडू लागली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by @fuckzelinskii

ओरडणारी महिला युक्रेनमधील एका चळवळीशी संबंधित असल्याचे समजते. सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे आणि युक्रेनमधील महिला वर्गावर रशियन सैनिक अत्याचार करत असल्याचा आरोप युक्रेनच्या सरकारने केला आहे. रशियाने हा आरोप फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर कान्समध्ये टॉपलेस महिला रेड कार्पेटवर आली होती. 

यंदाच्या कान्स फेस्टिव्हलची थीम युद्ध ही आहे. फेस्टिव्हलमध्ये १९ मे २०२२ रोजी मारियुपोलिस २ नावाचा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. या माहितीपटाचे दिग्दर्शन मंतस केवेदरविसिकस यांनी केले होते. काही दिवसांपूर्वी रशियन लष्कराच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये मंतस केवेदरविसिकस यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मंतस केवेदरविसिकस यांना श्रद्धांजली अर्पण करून मारियुपोलिस २ हा माहितीपट दाखविण्यात आला. फेस्टिव्हलमध्ये सादर करताना माहितीपट युक्रेनमधील सिनेसृष्टीला समर्पित करत असल्याचे जाहीर करण्यात आले. 

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय सिनेमांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी म्हणून भारताच्या दीपिका पदुकोण या अभिनेत्रीला विशेष निमंत्रण आहे. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतातून दीपिका पदुकोण तसेच ऐश्वर्या राय, उर्वशी रौतेला, पूजा हेगडे, तमन्ना भाटिया, आदिती राव हैदरी, हिना खान, हेली शाह, नवाजुद्दीन सिद्दीकी, ए. आर. रेहमान उपस्थित आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी