Darlings Trailer Out : 'Darlings' सिनेमाचा ट्रेलर आऊट, आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नंसी ग्लो

बी टाऊन
Updated Jul 25, 2022 | 20:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Darlings Trailer Out : आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) 'डार्लिंग्स' (Darlings) मध्ये शेफाली शाह, विजय वर्मा (Vijay Verma) आणि रोशन मॅथ्यू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकताच आलिया भट्टच्या या सिनेमाच्या ट्रेलर लाँच झाला आहे. निर्माती म्हणून आलियाची ही पहिली निर्मिती आहे.

Trailer out of Alia bhatt first film Darlings as producer
'डार्लिंग्स' सिनेमाचा ट्रेलर आऊट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आलिया भट्टची पहिली निर्मिती असलेला 'डार्लिंग्स'सिनेमाचा ट्रेलर आऊट
  • आलिया भट्ट आणि शेफाली शाह प्रमुख भूमिकेत
  • ट्रेलर लाँचच्यावेळी आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नंसी ग्लो

Darlings Movie trailer release date out : मुंबई : आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी 'डार्लिंग'(Darlings) या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. शाहरुख खान (Shahrukh khan )आणि आलिया भट्ट  (Alia Bhatt) यांच्या निर्मितीखाली तयार होणाऱ्या 'डार्लिंग्स'मध्ये शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. मात्र, आलिया भट्टने यावेळी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. प्रेग्नंसीची बातमी दिल्यानंतर आलिया पहिल्यांदाच अधिकृतपणे मीडियासमोर आलेली होती. ( Trailer out of Alia bhatt first film Darlings as producer )


मीडिया समोर आलेल्या आलियाच्या चेहऱ्यावरील प्रेग्नेंसी ग्लो पाहून 'मॉम टू बी' बनवले जात होते. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया खूपच क्यूट दिसत होती.आलिया भट्ट सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात खूपच खूश आहे. आलिया एकीकडे पती रणबीर सिंगसोबत तिच्या पहिल्या अपत्याची अपेक्षा करत आहे, तर दुसरीकडे ती तिच्या पहिल्या प्रोडक्शन 'डार्लिंग्स'साठी चर्चेत आहे. 

अधिक वाचा : Astro: य़ावेळेस तुम्ही झोपलात तर लक्ष्मी माता होऊ शकते नाराज

अभिनेत्रीसह आता आलिया एक निर्माती म्हणून एक नवी इनिंग सुरू करत आहे. जसमीत के रीन दिग्दर्शित 'डार्लिंग्स'मध्ये आलियासोबत शेफाली शाह ( Shefali Shah ), विजय वर्मा  (Vijay Verma) आणि रोशन मॅथ्यू (Roshan Mathew) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

अधिक वाचा : मस्क आणि गुगलचे सहसंस्थापक सर्गी ब्रिन यांच्या पत्नीचे अफेअर

आलिया सिनेमाचं आपल्या टीमसोबत जोरदार प्रमोशन करत आहे. ट्रेलर लॉन्चवेळी आलिया पिवळ्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये दिसली.पिवळ्या रंगाच्या पोशाखात आलिया खूपच सुंदर दिसत होती आणि तिचा प्रेग्नंसी ग्लो दिसत होता. या स्टायलिश आउटफिटसह आपला बेबीबंप  लपवण्यात आलियाला यश आले आहे. येत्या 5 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी