Ek Villain Returns Trailer Out: 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, प्रेक्षक खूप दिवसांपासून त्याची वाट पाहत होते. या चित्रपटात अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही जोडी पहिल्यांदाच सिल्व्हर स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच 'एक व्हिलन रिटर्न्स'चा फर्स्ट लूक रिलीज झाला होता,
त्यानंतर हा चित्रपट पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली होती. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते आणि आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूपच जबरदस्त आहे, ज्यामध्ये जॉन अब्राहम, दिशा पटानी, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया जबरदस्त भूमिकेत दिसत आहेत.
ट्रेलरच्या सुरुवातीलाच असे सांगण्यात आले आहे की, खलनायक तब्बल 8 वर्षांनी परतला आहे. आणि यावेळी तो एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलींना टार्गेट करत आहे. यावेळी हा खलनायक नव्या रुपात दिसणार आहे, कारण तो प्रेमभंग झालेल्या मुलींच्या बाजूने दिसणार आहे.या चित्रपटाची कथा जबरदस्त आहे कारण यात प्रेमकथेसह गुन्हेगारी आणि सस्पेन्स यांचा मेळ आहे. खरा खलनायक शोधण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. ट्रेलर पाहता, या कथेत जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर एकमेकांचे शत्रू असल्याचे दिसते. त्याचबरोबर तारा सुतारिया आणि दिशा पटानी देखील सस्पेन्सफुल पात्रांमध्ये दिसत आहेत.
अधिक वाचा : आता शिंदे सरकारची शनिवारी बहुमत चाचणी
ट्रेलरपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते, ज्यामध्ये या चित्रपटातील सर्व कलाकार अतिशय जबरदस्त भूमिकेत दिसले होते. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांनी प्रसिद्ध स्मायली मास्कने आपले चेहरे झाकले आहेत. पोस्टरनेच हा चित्रपट पाहण्याचा प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित केला आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्रच्या सत्तासंघर्षावर भन्नाट मीम्स
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर यांचा 'एक व्हिलन' हा चित्रपट २०१४ साली रिलीज झाला होता, जो हिट ठरला होता. 35 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 170 कोटी रुपयांचे कलेक्शन केले, ज्याचे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केले होते. आता एक व्हिलन रिटर्न्सचे दिग्दर्शनही मोहित सूरीने केले आहे.