Shabaash Mithu Trailer Out । मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा आगामी चित्रपट शाबाश मिट्ठूचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात तापसी भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजची भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनेत्री तापसी पन्नू चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी लवकरच भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे, ज्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मितालीचा बालपणापासून क्रिकेटर होण्यापर्यंतचा प्रवास उत्तम प्रकारे दाखवण्यात आला आहे. (Trailer release of Taapsee Pannu's Shabaash Mithu and Mithali Raj's biopic).
अधिक वाचा : ऑपरेशन ऑलआउट अंतर्गत 24 तासांत 7 दहशतवाद्यांचा खात्मा
लक्षणीय बाब म्हणजे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मिताली लहानपणी क्रिकेट खेळण्यात रमलेली असल्याचे दाखवण्यात आले आहे आणि प्रशिक्षक तिच्या पालकांना सांगतात की तिला योग्य प्रशिक्षण दिले तर ती राष्ट्रीय खेळाडू बनू शकते. यानंतर तिचे प्रशिक्षण आणि संघर्ष सुरू होतो. तापसी पन्नूचा हा चित्रपट २५ जुलैला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. तापसी पन्नूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट शाबाश मिठूच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. आठ वर्षांची मुलगी होण्यापासून ते क्रिकेट लेजंड पर्यंतचा मितालीचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे.
मिताली राज ही भारतीय महिला क्रिकेट संघातील एक महत्त्वाची खेळाडू आहे. तिने आपल्या कारकिर्दीत एकदिवसीय (ODI) सामन्यांमध्ये सलग ७ वेळा अर्धशतक झळकावली आहेत. मितालीने चार विश्वचषकांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. मिताली राजने अलीडकेड सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३९ वर्षीय मितालीने २३ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून प्रतिनिधित्व केले आणि अनेक मोठे यश संपादन केले. अलीकडेच तिने न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.