'तू झूठी मै मक्कार'ने आठव्या दिवशीपर्यंत इतक्या कोटींची कमाई, १०० कोटी क्लबमध्ये पोहोचणार

बी टाऊन
Updated Mar 17, 2023 | 18:30 IST | Times Now

tu jhoothi main makkar : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर या फ्रेश जोडीचा 'तू झुठी मैं मक्कार' सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे.

'तू झूठी मै मक्कार'ने आठव्या दिवशीपर्यंत इतक्या कोटींची कमाई, १०० कोटी क्लबमध्ये पोहोचणार
Tu Jhoothi Main Makkar Box Office Collection Day 8  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • झुठी मैं मक्कार'चे कलेक्शन १०० कोटींवर पोहोचण्याची शक्यता
  • आठव्या दिवसांपर्यंत ८३.३१ कोटींचे कलेक्शन
  • रणबीर-श्रद्धा ची ही जोडी भरघोस मनोरंजन

नवी दिल्ली : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर चा बहुचर्चित सिनेमा  'तू झूठी मैं मक्कार' चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा आणि रणबीर पहील्यांदाच एकत्र आले आहेत. होळीच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमाचा आजचा आकडा पाहता, हा चित्रपट आठव्या दिवशी शी बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे.  तू झूठी मैं मक्कार चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर पहिल्याच दिवशी चांगली कामगिरी करत भारतात १५.७३ करोड़ ची कमाई  केली होती. (tu jhoothi main makkar box office collection day 8, film soon to cross 100 crores)

हे पण वाचा Jeet Adani Engagement: कोण आहे दिवा जैमिन शाह जी होणार गौतम अदानींच्या घरची सुन, पाहा फोटो

रणबीर-श्रद्धा च्या या जोडीने प्रदर्शनाच्या सातव्या दिवसांपर्यंत ८३.३१ कोटींचे कलेक्शन गोळा केले होते. सुरुवातीचे आकडे पाहिले तर या चित्रपटाने आठव्या दिवशी भारतामध्ये ५.६० करोड़ चे कलेक्शन केलं आहे. म्हणजे, या आठ दिवसांत आतापर्यंत एकूण ८७.९१ करोड़ चा व्यवसाय केला आहे.  Sacnilk द्वारे हे नंबर समोर आले असून,  रणबीर-श्रद्धा ची ही जोडी सिने रसिकांचे भरघोस मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. 

हे पण वाचा  येत आहे देशातली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार

येत्या आठवड्यात हा चित्रपट आणखीन काही दिवस चांगली कामगिरी बजावेल असा अंदाज असून, या आठवड्यात तू जुठी मैं मक्कार १०० करोड चा पल्ला पार करेल असे म्हंटले जात आहे. रणबीर कपूर याआधी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामधून दिसला होता. तर श्रद्धा कपूरचा 'बागी ३' हा चित्रपट आला  होता. 'तू झूठी मै मक्कार' या सिनेमानंतर ती लवकरच 'नो मीन्स नो' या चित्रपटात दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी