तुनिषाचा मृतदेह पाहून आईची शुद्ध हरपली, अंगावर काटा आणणारा Viral Video

बी टाऊन
Updated Dec 28, 2022 | 18:19 IST | Times Now

जेजे हॉस्पीटलच्या पोस्टमार्टम विभागाने तुनिषा शर्माचा मृतदेह परिवाराकडे दिला आहे. तिचे पार्थिव पाहाण्यासाठी कुटूंबिय हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. तिच्या अकाली मृत्यूने परिवाराला आणि विशेषतः आईला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. काल रात्री जेव्हा त्यांनी मुलीला पाहिले, तेव्हा त्या बेशुद्ध झाल्या.

After seeing her dead body, Tunisha's mother faints
तुनिषाचा मृतदेह पाहून आई कोसळली, अंगावर काटा आणणारा व्हीडीयो व्हायरल 
थोडं पण कामाचं
  • आईला जबरदस्त मानसिक धक्का
  • अंतिम संस्कार २७ डिसेंबरला
  • लव जिहाद ?

After seeing dead body, Tunisha's mother faints  : तुनिषा शर्माचा मृतदेह पोस्टमार्टम नंतर तिच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला. सध्या अनेक व्हिडीओमध्ये मृतदेह स्वीकारण्यासाठी आलेली अभिनेत्रीची आई दिसत आहेत. 'अली बाबा: दास्तान-ए- काबुल' या मालिकेच्या सेटवर तुनिषाने २४ डिसेंबर २०२२ ला शेवटचा श्वास घेतला. तिने शीजान मोहम्मद खान या सहकलाकाराच्या मेकअपरू मध्ये आत्महत्या केलेली. तिच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण टेलीव्हीजन इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.  

जेजे हॉस्पिटलच्या पोस्टमार्टम विभागाने तुनिषा शर्माचा मृतदेह परिवाराकडे दिला आहे. तिचे पार्थिव ताब्यात घेण्यासाठी घरातले सदस्य हॉस्पिटलमध्ये आले. तुनिषाच्या अकाली मृत्यूने तिच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला आहे. जेव्हा त्यांनी मुलीला पाहिले, तेव्हा त्या बेशुद्ध झाल्या. अचानक त्यांची परिस्थिती इतकी गंभीर झाली, की स्वतःच्या पायावर चालणे सुद्ध त्यांना अशक्य होते. त्यामुळे कुटूंबियाच्या आधाराने त्या हॉस्पिटलपासून गाडीपर्यंत आल्या. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल होतोय.

तुनिषाचा अंतिम संस्कार २७ डिसेंबरला होणार आहे. 
शर्मा परिवार तिच्या मावशीच्या प्रतीक्षेत आहेत. त्या २६ डिसेंबरलाच पोहोचणार होत्या मात्र नाताळमुळे त्या वेळेत मुंबईत पोहेचू शकल्या नाहीत. त्यामुळे २७ डिसेंबर २०२२ ला दुपारी ३ - ४ वाजता तुनिषाचे अंत्यसंस्कार होणार आहेत.

लव जिहाद ?

बॉयफ्रेंड शीजान खानवर वनिता शर्मांनी गंभीर आरोप केला आहे. या आरोपांप्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी शीजान खानला अटक केली. त्याला कोर्टासमोर उभं केलं असून रिमांड्मध्ये घेण्यात आलं आहे. पंधरा दिवसांपूर्वी शीजान खान सोबत झालेला ब्रेकअप हे आत्महत्येचे कारण असावे असे पोलीस म्हणाले. मात्र पोलीस वेगवेगळ्या दृष्टीकोनातून तपास करत आहेत. पोलिसांनी सध्या तरी लव्ह जिहादमधून गुन्हा घडल्याची शक्यता फेटाळली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी