Ranveer Singh Nude photoshoot : रणवीर सिंगच्या Nude फोटोशूटवर 'या'अभिनेत्रीची धक्कादायक प्रतिक्रिया, "म्हणाली, मीही तेच करेन..."

बी टाऊन
Updated Jul 30, 2022 | 13:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

TV Celeb On Ranveer Singh: रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटवर (Ranveer Singh Nude Photoshoot) एका टीव्ही अभिनेत्रीने आश्चर्यकारक विधान केले आहे. या अभिनेत्रीने रणवीर सिंगला नुसता पाठिंबाच दर्शवलेला नाही. तर "मीही तेच करेन असं विधान या अभिनेत्रीने केले आहे."

TV Actress Shrijita de's reaction on Ranveer singh Nude photoshoot
अभिनेत्री श्रीजीता डेचा रणवीर सिंगच्या फोटोशूटला सपोर्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री श्रीजीता डेचा रणवीर सिंगच्या फोटोशूटला पाठिंबा
  • न्यूड फोटोशूट करण्यासाठी हिम्मत, आणि धाडस लागत असल्याचंही श्रीजीताने म्हटले आहे
  • "मलाही रणवीर सिंग सारखे फोटोशूट करायला आवडेल" अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली आहे.

Ranveer Singh Controversial Pictures: बॉलीवूडचा हँडसम हंक रणवीर सिंग (Ranveer Singh) त्याच्या विचित्र फॅशनमुळे अनेकदा चर्चेत असायचा, पण जेव्हा त्याने न्यूड फोटोशूट (Ranveer Singh Nude Photoshoot) केले तेव्हा तो वादात सापडला. रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरून सध्या खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर रणवीरवर टीकेची झोड उठत असतानाच त्याच्यावर अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात येत आहेत. मात्र, बॉलीवूडपासून टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतचे अनेक स्टार्स त्याच्या समर्थनात उतरले आहेत. आता आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने त्याला पाठिंबा दिला आहे. ( TV Actress Shrijita de's reaction on Ranveer singh Nude photoshoot )

अधिक वाचा : तुम्ही बँक खात्याबाबत ही चूक तर करत नाही ना?


रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर श्रीजीता डेची प्रतिक्रिया

'तुम्ही हो बंधू सखा तुमही हो' आणि 'उत्तरन' सारख्या शोमध्ये काम केलेली टीव्ही अभिनेत्री श्रीजीता डे हिने नुकतीच रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'ईटाईम्स'शी बोलताना श्रीजीताने कॅप्शनमध्ये लिहिले की, "एखाद्या महिला सुपरस्टारने असे बोल्ड फोटोशूट केले असते तर लोकांच्या प्रतिक्रिया कशा आल्या असत्या हे मला समजत नाही.मला एवढेच सांगायचे आहे की असे करणे ही धाडसाची गोष्ट होती. हे स्वतःवर प्रेम करण्यासारखे आहे, स्वतःला प्रथम स्थान देणे आणि लोकांच्या निर्णयापासून स्वतःला दूर ठेवणे. 90 च्या दशकात शक्ती कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनी असेच केले होते. त्यांनी जे काही केले ते प्रेरणादायी होते.”

अधिक वाचा :  भरपूर मासे पाहून मांजराच्या तोंडाला सुटलं पाणी


रणवीर सिंगविरुद्धच्या एफआयआरवर श्रीजीताचे वक्तव्य

न्यूड फोटोशूटमुळे संतप्त झालेल्या काही लोकांनी रणवीर सिंगविरोधात एफआयआर दाखल केली आहे. यावर श्रीजीता म्हणाली, “मला समजत नाही की आपण इतरांच्या आयुष्यात का ढवळाढवळ करतो.काही व्यक्तींनी न्यूड फोटोशूट केल्यामुळे अभिनेत्याविरुद्ध एफआयआर दाखल केलेली आहे. तुम्ही 21 व्या शतकात आहात, तुमची शरीरयष्टी चांगली असेल, तुम्ही त्यात कम्फर्टेबल असाल आणि तुमच्यात हिम्मत असेल, तर का नाही! मीही तेच करीन" अशाप्रकारे न्यूड फोटोशूट करण्यासाठी हिम्मत लागते. तुमचं मानसिक संतुलन नीट असावं लागतं. इतरांच्या बोलण्याचा, वागण्यचा तुमच्यावर परिणाम होऊ न देता सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. 'My life... My rules' ही संकल्पना लोकांना का समजत नाही हे नाही." असेही अभिनेत्रीने स्पष्ट केले आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी