‘उखाड दिया’, कंगना राणावतला शिवसेनेचे उत्तर, ‘सामना’मध्ये लिहिला लेख

बी टाऊन
Updated Sep 11, 2020 | 13:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shivsena Vs Kangana Ranaut: असा आरोप करण्यात येत आहे की कंगनाच्या कार्यालयावर कारवाई अशावेळी करण्यात आली आहे जेव्हा तिने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते

Kangana Ranaut
‘उखाड दिया’, कंगना राणावतला शिवसेनेचे उत्तर, ‘सामना’मध्ये लिहिला लेख  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • बीएमसीने कंगनाच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामावर चालवला होता हातोडा
  • या कारवाईवरून कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला होता हल्लाबोल
  • आता शिवसेनेने सामनामधील लेखातून दिले कंगनाला उत्तर

मुंबई: शिवसेना (Shivsena ) आणि बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद (Kangana Ranaut) मिटण्याची चिन्हे अद्याप अदृश्यच आहेत. नऊ सप्टेंबरला  कंगनाच्या कार्यालयाची बीएमसीने केलेली तोडफोड योग्यच असल्याचे मत शिवसेनेने मांडले आहे. शिवसेनेने गुरुवारी ‘सामना’ या (Shivsena’s mouthpiece Saamna) आपल्या मुखपत्रात ‘उखाड दिया’ अशा शीर्षकासह एक लेख प्रसिद्ध झाला. शिवसेनेने या लेखाद्वारे कंगना राणावतला उत्तर दिले आहे, कारण काही दिवसांपूर्वी तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले (Kangana’s tweet) होते, ‘महाराष्ट्र कुणाच्या बापाचा (Maharashtra) नाही, महाराष्ट्र त्यांचा आहे ज्यांनी मराठी गौरवाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. मी छातीठोकपणे सांगते की हो, मी मराठा आहे , उखडा माझे काय उखडायचे  ते.’ इतकेच नाही, तर या लेखात शिवसेनेने बीएमसीच्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या विधानाचाही हवाला (reference of NCP chief Sharad Pawar’s statement about BMC’s action) दिला आहे.

शिवसेना आणि कंगना यांच्यातला वाद विकोपाला

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला ती मुंबईत पोहोचल्यावर बघून घेण्याची धमकी दिली होती. या धमकीला उत्तर देताना कंगनाने म्हटले होते की ती नऊ सप्टेंबर रोजी मुंबईत पोहोचते आहे. यासोबतच तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यानंतर कंगना शिवसेना नेत्यांच्या निशाण्यावर आली. शिवसेनाने कंगनाचे हे वक्तव्य महाराष्ट्रासाठी अपमानास्पद असल्याचे सांगत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. याचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेतही उमटले आणि तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

मुंबईत पोहोचल्यावर कंगनाचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

आपल्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर कंगनाने महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारबद्दल आणखीच आक्रमक झाली आहे. मुंबईत पोहोचल्यावर तिने बीएमसीच्या या कारवाईसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तिने त्यांना संबोधित करत म्हटले, ‘आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझी घमेंड तुटेल.’ आपल्या कार्यालयात करण्यात आलेल्या तोडफोडीविरोधात तिने मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून यावर सुनावणी सुरू आहे.

बीएमसीच्या कारवाईवर उठले प्रश्न

कंगनाच्या पाली हिलवरील कार्यालयावर बीएमसीने केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. असा आरोप करण्यात येत आहे की ही कारवाई अशावेळी करण्यात आली आहे जेव्हा तिने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते. असे म्हटले जात आहे की कंगनाचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई सूडभावनेने करण्यात आली आहे. तर बीएमसीने आपली कारवाई योग्यच असल्याचा दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी नियमांनुसारच ही कारवाई केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी