Unpaused : 'अनपॉज्ड: नया सफर'चा ट्रेलर लाँच

Unpaused : Naya Safar - Official Trailer : 'अॅमेझॉन प्राईम व्हीडिओ'च्या वतीने हिंदी कथांचा संग्रह असलेला 'अनपॉज्ड: नया सफर'चा ट्रेलर लाँच करण्यात आला.

Unpaused : Naya Safar - Official Trailer
Unpaused : 'अनपॉज्ड: नया सफर'चा ट्रेलर लाँच 
थोडं पण कामाचं
  • Unpaused : 'अनपॉज्ड: नया सफर'चा ट्रेलर लाँच
  • 'अनपॉज्ड: नया सफर'चा प्रीमियर जगभर २१ जानेवारी २०२२ रोजी २४० हून अधिक देशात होणार
  • 'अनपॉज्ड: नया सफर'च्या पहिल्या आवृत्तीला भरभरून प्रतिसाद मिळाला

Unpaused : Naya Safar - Official Trailer : मुंबई : 'अॅमेझॉन प्राईम व्हीडिओ'च्या वतीने हिंदी कथांचा संग्रह असलेला 'अनपॉज्ड: नया सफर'चा ट्रेलर लाँच करण्यात आला. 'अनपॉज्ड: नया सफर'चा प्रीमियर जगभर २१ जानेवारी २०२२ रोजी २४० हून अधिक देशात होणार आहे. 'अनपॉज्ड: नया सफर'च्या पहिल्या आवृत्तीला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्याचा प्रीमियर २०२० मध्ये झाला होता. 

महासाथीने प्रत्येकाच्या जीवनात आव्हाने निर्माण केली, प्रत्येकाची प्रतिसाद देण्याची स्वत:ची निराळी पद्धत असते. अॅमेझॉन ओरिजनल 'अनपॉज्ड: नया सफर'च्या दुसऱ्या आवृत्तीत अभिनव स्वरूपाच्या पाच हिंदी शॉर्ट फिल्म्सचा समावेश असेल. नवीन वर्षाचे स्वागत करताना सकारात्मक बाजूंवर भर देण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे.  

कसदार अभिनयाकरिता प्रसिद्ध असलेले साकीब सलीम, श्रेया धन्वंतरी, नीना कुलकर्णी आणि प्रियांशू पेनयुली यात प्रमुख व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळतील. अंधाऱ्या बोगद्याच्या शेवटी प्रकाशाचा साक्षात्कार होतो, हे हृदयस्पर्शी संस्मरण 'अनपॉज्ड: नया सफर'मधून दिल्याचे दिसते. मालिकेचा ट्रेलर सुंदर आहे. प्रेम आणि सकारात्मकतेत गुंफलेल्या कथा, नव्या वर्षाची नवी सुरुवात करण्याची उमेद आपल्याला देऊन जातात.  

कथामालिकेतील शॉर्टफिल्म

  1. वैकुंठ, नागराज मंजुळे दिग्दर्शित; अर्जुन करचे आणि हनुमंत भंडारी अभिनीत.
  2. तीन तिघाडा, दिग्दर्शन- रुचिर अरुण; साकीब सलीम, आशीष वर्मा आणि सॅम मोहन अभिनीत.
  3. द कपल, दिग्दर्शन- नुपूर अस्थाना; श्रेया धन्वंतरी आणि प्रियांशू पेनयुली अभिनीत.
  4. गोंद के लड्डू, शिखा माकन दिग्दर्शित; दर्शना राजेंद्र आणि लक्षवीर सिंग सरन अभिनीत.
  5. वॉर रूम, अयप्पा केएम दिग्दर्शित; गीतांजली कुलकर्णी, रसिका आगाशे, पुरनंदन वांधेकर आणि शर्वरी देशपांडे अभिनीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी