Uorfi Javed on Islam and Sanatan: काही महिन्यांपूर्वी उर्फी जावेदला ( Uorfi Javed ) स्वत:ची ओळख सांगावी लागत होती. आज मात्र संपूर्ण जग तिला ओळखते. अनेक टीव्ही शो केल्यानंतरही तिला जी ओळख मिळू शकली नाही.ती ओळख त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. कंगना राणावतपासून कियारा अडवाणीपर्यंत अनेक सौंदर्यवतींना मागे टाकत आज ती आशियाई सेलिब्रिटींच्या यादीत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींच्या पुढे आहे. उर्फी तिच्या विधानांमुळे बरीच चर्चेत असते. अलीकडेच तिने सनातन आणि इस्लाम धर्मावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ( Uorfi Javed raised question on Sanatan and Islam religion)
उर्फी जावेदला आपला मुद्दा स्पष्टपणे कसा मांडायचा हे चांगलेच ठाऊक आहे. मग भले ते लोकांना आवडो किंवा नाही, उर्फी त्याची फिकीर करत नाही. सोशल मीडिया यूजर्सने त्यासाठी तिला ट्रोल केले तरी तिला काही फरक पडत नाही. ती स्वत:चा मुद्दा बिनदिक्कतपणे मांडते.
उर्फीने अलीकडेच टेली मसालाशी संवाद साधला. यावेळी तिने इस्लाम आणि सनातन धर्मावर आपले मत मांडले. यासोबतच तिने शोमधून अचानक घेतलेल्या रजा आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलही सांगितले.
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने सांगितले की, इस्लाम अडीच हजार वर्षे जुना आहे, तर सनातन धर्माची स्थापना पाच हजार वर्षांपूर्वी झाली. उर्फी म्हणाली, "दोन्ही धर्मांने आपापले नियम-कायदे बनवले, मात्र आज हे नियम-कायदे पाळणारे कुठे आहेत. कोण फॉलो करतं हे ?"
या मुलाखतीत अभिनेत्री पुढे म्हणाली, "इस्लाममध्ये असे सांगण्यात आले आहे की संगीत जास्त ऐकू नये. पण का? याचे उत्तर नाही. एवढेच नाही तर हिंदू धर्मात कन्यादान केले जाते. तुम्ही मुलीला दान का देत आहात? मुलगी ही दान करण्यासारखी गोष्ट आहे का?" असे प्रश्न उर्फीने दोन्ही धर्माबद्दल उपस्थित केलेले आहेत.
उर्फीला टीव्ही इंडस्ट्रीत खूप संघर्ष करावा लागला. उर्फी म्हणाते, 'माझा कुठलाही शो यायचा आणि मग तो तीन महिन्यांत बंद व्हायचा किंवा मला रिल्प्लेस करण्यात यायचे आणि उद्यापासून येऊ नको' असे सांगितले जात होते.
उर्फी म्हणाली, 'मी निर्मात्याला मेसेज केला की हा काय कारण आहे सांगा. पुढे उर्फीने असेही सांगितले की, सुरुवातीला माझे ध्येय इथे टिकून राहायचे होते, कारण तेव्हा माझ्याकडे खायलाही पैसे नव्हते. लोकांना त्यांच्या धर्मावर बोलणे खटकत आहे. दोन धर्मांवर बोलण्याची ती पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने इस्लामला मानत नसल्याचे म्हटले आहे.
जेव्हा उर्फी काळ्या रंगाचा ड्रेस घालून स्वॅगमध्ये आली होती आणि तिने सांगितले होते की तिचा ड्रेसिंग सेन्स पाहून मुले बिघडणार नाहीत? हा प्रश्न ऐकून उर्फी रागाने लाल झाली.
प्रश्नाच्या उत्तराने ती म्हणाली, 'रामायण पाहिल्यानंतर मुले बरी होतात. मला पाहून तू अस्वस्थ होतील. अॅडल्ट कंटेंटवर बंदी येत नाही. मला बंदी घालायची आहे व्वा... म्हणजे अॅडल्ट कंटेंट पाहून मुलं बिघडणार नाहीत, मला पाहून बिघडतील'.