Urfi Javed Trolled Social Media : उर्फी जावेद (Urfi Javed ) तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी नेहमीच वेगवेगळे फॅशन प्रयोग करत असते. उर्फीचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. उर्फीने सॅकपासून डिस्को बॉलपर्यंत सगळं वापरून कपडे बनवले आहेत. उर्फीने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. तिच्या त्या व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यावर यूजर्स खूपच संतापले आहेत. उर्फीचा नवा लूक खूपच बोल्ड आहे. उर्फीचे स्टाइल स्टेटमेंट पाहून युजर्सनी सोशल मीडियावर तिची शाळा घेतली आहे.
काही लोकांना उर्फीचे बोल्ड स्टाइल स्टेटमेंट आवडले आहे, तर दुसरीकडे बहुतेक युजर्सनी तिची तुलना राज कुंद्राशी केली आहे.तिच्या या फॅशन सेन्समुळे उर्फी पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.
अधिक वाचा : अरबाज खानच्या 'या' सवयीमुळे मलायकाचा संताप?
या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद डिस्को थीममध्ये दिसत आहे. उर्फीने डिस्को बॉल स्टाईलमध्ये तिचा चेहरा पूर्णपणे झाकला आहे. दुसरीकडे, उर्फीने डिस्को थीम पॅटर्नने तिचे breast कव्हर केले आहेत. उर्फीने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'दर्द ए डिस्को, यात मेकअप आणि हेअरला काय क्रेडिट देऊ?' त्याचवेळी व्हिडिओच्या मागे शाहरुख खानच्या ओम शांती ओम या सिनेमातील दर्द ई डिस्को हे गाणे वाजत आहे.
उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने शेअर होऊ लागला आहे. तिच्या या व्हिडिओवर यूजर्स कमेंटही करत आहेत. काही सोशल मीडिया यूजर्स उर्फीच्या स्टाइल स्टेटमेंटचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे तिला ट्रोलही केले जात आहे. व्हिडिओमध्ये उर्फीने चेहरा झाकलेला असल्याने काहींनी कमेंटमध्ये तिला राज कुंद्राची बहीण म्हणून संबोधले आहे.
अधिक वाचा : 'या' अभिनेत्रीने केलेला सलमान खानवर बलात्काराचा आरोप
उर्फी जावेदने याआधी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये उर्फीने फक्त जीन्स घातली होती, तिच्या शरीराचा वरचा भाग लांब केसांनी झाकलेला होता. 4 ऑगस्ट रोजी उर्फीने हे फोटो शेअर केले होते. हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. या फोटोंवर सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या.
उर्फी जावेदचा फॅशन सेन्स
उर्फी जावेदने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उर्फी तिच्या फॅशन सेन्समुळे खूप चर्चेत आहे. तिच्या फॅशन सेन्समुळे उर्फी कधी तिच्या कपड्यांबद्दल प्रशंसा मिळवते तर कधी ट्रोल होते. उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. उर्फीने इंस्टाग्रामवर आतापर्यंत 2131 पोस्ट केल्या आहेत आणि तिला 3.6 दशलक्ष लोक फॉलो करतात. उर्फी जावेद स्वतः ३७७ लोकांना फॉलो करते.