Urfi Javed SIM Card Dress: उर्फी जावेदने (Urfi Javed) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये उर्फीचा सिम कार्ड ड्रेस ( Urfi Javed SIM Card Dress) बनवतानाचा व्हिडिओ आहे. उर्फीने हा व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. (urfi javed hair stylist share video off urfi's sim card dress making )
उर्फी जावेद नेहमीच तिच्या लूकमध्ये काही ना काहीतरी अतरंगी करत असते. यावळी उर्फीने चक्क सिमकार्डने ड्रेस तयार केलेला आहे. या ड्रेसमधील उर्फीच्या फोटोने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे. उर्फी जावेदच्या हेअरस्टायलिस्टने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. उर्फीचा सिमकार्ड ड्रेस कसा बनवला आहे हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे, हा ड्रेस तयार करण्यासाठी खूप मेहनत घेण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसेलच.
अधिक वाचा : प्रियंकाने सगळ्यांसमोर निकला केलं Lip Kiss
उर्फी जावेदचा हा सिमकार्ड ड्रेस दिसायला खूपच सुंदर होता. तिच्या चाहत्यांना विश्वासच बसत नव्हता की सिमकार्डच्या मदतीने हा ड्रेस तयार करण्यात आलेला आहे. उर्फीची हेअरस्टायलिस्ट गीता जैस्वाल यांनी हा व्हिडिओ शेअर केला. त्यात सिमकार्डचा ढीग दिसत आहे. सिमकार्डला छोटी छोटी छिद्रेही पाडण्यात आली आहेत. नंतर ती सिमकार्ड एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत.
उर्फीच्या हेअरस्टाइलिस्टने दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये सिमकार्ड एकत्र करून त्यामध्ये छिद्रे पाडण्यात आली आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये रिंगच्या मदतीने सिमकार्ड एकमेकांशी जोडण्यात आली आहेत. त्यानंतर त्यापासून ड्रेस तयार करण्यात आला आहे. हा ड्रेस तयार करताना उर्फीच्या टीमला खूप मेहनत घ्यावी लागली असणार हे व्हिडिओ पाहूनच लक्षात येत आहे.
अधिक वाचा : Taarak Mehta मधील टप्पूच्या फोनमध्ये नेमकं आहे तरी काय?VIDEO
उर्फीने डिस्को बॉल स्टाईलमध्येही ड्रेस वेअर केला होता. तर उर्फी जावेदने याआधी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये उर्फीने फक्त जीन्स घातली होती, तिच्या शरीराचा वरचा भाग लांब केसांनी झाकलेला होता. 4 ऑगस्ट रोजी उर्फीने हे फोटो शेअर केले होते. हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. या फोटोंवर सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या.उर्फीच्या ड्रेसिंग स्टाईलवर नेहमीच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत असतात.