Urfi Javed Outfit: उर्फी जावेदच्या लूकने पुन्हा एकदा चाहते आश्चर्यचकीत, 20 किलोचा काचेचा ड्रेस केला परिधान

बी टाऊन
Updated May 22, 2022 | 15:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Urfi Javed New Look: उर्फी जावेद तिच्या विचित्र लूकने लोकांचे लक्ष वेधून घेते. मात्र, यावेळी तिचे आउटफिट्स केवळ चर्चेतच नाहीत तर लोकांना आश्चर्यचकीत करत आहेत.

Urfi Javed's look once again surprised the fans, wearing a 20 kg glass dress
उर्फी जावेदची हटके स्टाईल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उर्फी जावेदचा हटके लूक
  • उर्फीच्या लूकने चाहते आश्चर्यचकीत
  • उर्फीने परिधान केला 20 किलोचा काचेचा ड्रेस

Urfi Javed Glass Outfit: उर्फी जावेद जे करते ते वेगळ्या पद्धतीने करते. नेहमी आपल्या कपड्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीने यावेळी 20 किलोचा ड्रेस परिधान केला होता. हा 20 किलोचा ग्लास आउटफिट होता ज्यामध्ये उर्फी खूपच ग्लॅमरस दिसत होती. उर्फीने हा ड्रेस एका खास प्रसंगी परिधान केला होता. उर्फीचे इन्स्टाग्रामवर ३ मिलियन फॉलोअर्स आहेत. हे सेलिब्रेट करण्यासाठी उर्फीने पार्टी दिली आणि त्याच पार्टीत उर्फीने ही हॉट स्टाईल दाखवली. 

अधिक वाचा : तुम्हालाही रात्री घाम येतो? या आजारांचा वाढू शकतो धोका


उर्फीने हा पांढऱ्या ड्रेस परिधान केला होता ज्याच्या बाहेर काच होती. ही पार्टी एका क्लबमध्ये झाली आणि त्यात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.राखी सावंत, अक्षित सुखीजा, प्रियांक शर्मा आणि उर्फीचे मॅनेजर संजित आसगावकर या पार्टीत सहभागी झाले होते आणि उर्फीने सर्वांसोबत भरपूर पोज दिल्या. बिग बॉस ओटीटीमध्ये सामील झाल्यानंतर उर्फी जावेद सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. उर्फीच्या कपड्यांबद्दल बरीच चर्चा होत आहे आणि तिची प्रत्येक स्टाईल व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीला लोक ट्रोलही करतात. तिच्यावर असभ्य कमेंट्स देखील करतात आणि उर्फी कधीकधी त्याला योग्य उत्तर देते. असं असलं तरी, काय घालावं आणि काय नाही हे प्रत्येक मुलीची निवड असते,पण उर्फीने एक गोष्ट सिद्ध केली आहे की 'तुम्ही तिच्यावर प्रेम करू शकता किंवा तिचा तिरस्कार करू शकता, परंतु तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही'. उर्फीने या पोशाखासोबत काचेच्या तुकड्यांनी बनवलेला एक श्रग घातला होता. 

प्रत्येक वेळेप्रमाणे उर्फीच्या या लूकनेदेखील  हेडलाईन होण्यात यश मिळवले. मात्र, तिची ही झलक समोर आल्यानंतर अनेक प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागले, अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये विचारले आहे. एका यूजरने लिहिले, 'ती अशी कशी बसेल?' दुसऱ्याने लिहिले, 'ती प्रवास कसा करू शकते?'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी