Urfi Javed Latest look: पारदर्शक ड्रेस घातल्याने पुन्हा एकदा उर्फी ट्रोल, ट्रोलर्सना उर्फीचे सडेतोड प्रत्युत्तर

बी टाऊन
Updated May 12, 2022 | 18:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Urfi Javed Befitting Reply: उर्फी जावेदने अलीकडेच तिचा लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या लूकसाठी तिला खूप ट्रोल केले जात आहे. अशा परिस्थितीत आता अभिनेत्रीने ट्रोलर्सना प्रत्युत्तर देण्यासाठी इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा फोटो शेअर करून तिचे विधान केले आहे.

Urfi trolls once again wearing transparent dress
उर्फी जावेद ड्रेसिंग सेन्समुळे पुन्हा एकदा ट्रोल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उर्फी जावेद ड्रेसिंग सेन्समुळे पुन्हा एकदा ट्रोल
  • उर्फी जावेदचे ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर
  • उर्फीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Urfi Javed Befitting Reply: उर्फी जावेदने अलीकडेच तिचा लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या लूकसाठी तिला खूप ट्रोल केले जात आहे. अशा परिस्थितीत आता अभिनेत्रीने ट्रोलर्सना प्रत्युत्तर देण्यासाठी इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा फोटो शेअर करून तिचे विधान केले आहे. 

उर्फी जावेदचा व्हिडिओ


उर्फी जावेदने  (Urfi Javed) ब्रा आणि पारदर्शक ड्रेस घालून आपला फॅशन सेन्स दाखवला आहे. विशेष म्हणजे ही सामान्य ब्रालेट नसून खास आहे. 
समुद्रकिनारी सापडलेल्या प्राण्यांच्या कवचापासून ते स्वत: अभिनेत्रीने तयार केले आहे. प्राण्यांच्या कवचाला रंग देऊन आणि त्याला ताराच्या साहाय्याने बांधून अभिनेत्रीने ब्रालेट तयार केली आहे. उर्फीचा हा लूक चाहत्यांना आवडला असतानाच दुसरीकडे काही लोकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Uorfi (@urf7i)


अभिनेत्रीचे ट्रोलर्सना उत्तर

उर्फीने स्वत:वर काही नियंत्रण ठेवायला हवे, असे ट्रोलर्सचे म्हणणे आहे. यासोबतच काही लोक उर्फीला अंडरगारमेंट घालण्याचा सल्लाही देताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत, उर्फीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या लुकचा फोटो शेअर करताना लिहिले, 'तुमचा हा मूर्खपणा बंद करा ! मी स्पष्टपणे त्वचेच्या रंगाचे अंडरवेअर घातले आहे. तुमच्यासारखे लोक खूप सामान्य आहेत. तुमचा कॉमन सेन्स आणि अक्कल वापरा.'

फॅशन सेन्समुळे उर्फी नेहमीच चर्चेत


उर्फी जावेद  (Urfi Javed) आपल्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. चाहते अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोची आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि उर्फी (Urfi Javed Latest Look) तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करताच, काही मिनिटांतच तो व्हायरल होतो.


पारदर्शक ड्रेस घालून उर्फीच्या मादक अदा

जास्तीत जास्त हॉट दिसण्यासाठी उर्फीने तिच्या पायांभोवती पारदर्शक ओढणी गुंडाळली आहे. समुद्रकिनारी असलेली ही अभिनेत्री लेटेस्ट फोटोशूटमध्ये अतिशय मस्त स्टाईलमध्ये तिचा लूक फ्लॉंट करताना दिसत आहे. लूकचे तपशील उर्फीने स्वतःच्या पोस्टमध्ये शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये उर्फी अतिशय सुंदर लूक देत आहे. हा व्हिडीओ पोस्ट होताच इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून नेटिझन्ससोबतच फॅशन तज्ज्ञांचीही उर्फीच्या या प्रयोगाला पसंती मिळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी