Urfi Javed। मुंबई : सोशल मीडियावर सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) दररोजच्या तिच्या नवीन फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. आता उर्फीचा नवीन व्हिडिओ (Urfi Javed Latest Video) सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत असून तिचा हा लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे. व्हिडिओतील या बॅकलेस स्टाईलमध्ये चालत असताना उर्फी अचानक वळली ते पाहून चाहते विविध प्रतिक्रिया देखील देत आहेत. (Urfi's unique move in a backless dress, suddenly turned and won the hearts of the fans).
अधिक वाचा : पिडीता म्हणाली 'डांबून ठेवलं आणि खोटे आरोप करायला सांगितलं'
उर्फी जावेदचा (Urfi Javed Photos) हा ताजा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिच्या लूकबद्दल भाष्य करायचे झाले तर तिने फ्लोरल प्रिंटचा सुंदर वन पीस ड्रेस घातला आहे. या उन्हाळ्यात बॅकलेस ड्रेसमध्ये सर्वजण उर्फीचा हा लूक पाहत आहेत. उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर (Urfi Javed Instagram) हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहले की, "पाहत राहा, तिने केसांचा बांधून तिचा लूक पूर्ण केला आहे. यासोबतच या लुकमध्ये गुलाबी रंगाच्या हाय हील्स वेगळ्या पद्धतीने हायलाइट केल्या जात होत्या.
अधिक वाचा : Big News: अमेरिकेला मिळाले टी-२० वर्ल्डकपचे तिकीट
उर्फी जावेदने तिच्या अनोख्या लूक्समुळे (Urfi Javed Looks) खूप कमी कालावधीत फॅशन इंडस्ट्रीत मोठे स्थान मिळवले आहे. फोटोशूट असो किंवा स्पॉटेड लूक असो, प्रत्येक वेळी उर्फी तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी वेगळे करते आणि त्यामुळेच ती नेहमीच चर्चेत असते.
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल भाष्य करायचे झाले तर उर्फीने हिंदी टीव्ही मालिकांमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. उर्फीने २०१६ मध्ये 'बडे भैया की दुल्हनिया' ही मालिका केली होती. यानंतर उर्फीने अनेक मालिकांमध्ये काम केले, या अभिनेत्रीने बिग बॉस ओटीटीमधून खूप लोकप्रियता मिळवली. उर्फी जावेद आजकाल म्युझिक व्हिडिओंमध्ये तिचे नशीब आजमावत आहे. उर्फी जावेदला इंस्टाग्रामवर रील्स बनवण्याची खूप आवड आहे. ट्रेंडिंग गाण्यांवर ती डान्स करताना व्हिडिओ बनवताना सतत पाहायला मिळते.