अमिताभ बच्चन ट्रोल, जनता कर्फ्यूचा संबंध अमावस्येशी जोडल्यामुळे बिग बी वादात

बी टाऊन
Updated Mar 23, 2020 | 18:10 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Amitabh Bachchan Tweet on Janta Curfew: नुकतंच अमिताभ बच्चन यांनी केलेलं एक ट्विट वादात सापडलंय. सोशल मीडियावर यूजर्सनी बिग बींना ट्रोल केलंय. जाणून घ्या काय घडलंय असं...

Amitabh Bachchan trolled
अमिताभ बच्चन ट्रोल, जनता कर्फ्यूचा संबंध अमावस्येशी जोडला   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बिग बी अमिताभ बच्चन यांचं ट्रोलिंग
  • जनता कर्फ्यूच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता थाळीनादाचा संबंध अमावस्येशी जोडणारं केलं होतं ट्विट
  • ट्रोलिंगनंतर अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून वादग्रस्त ट्टिट केलं डिलिट

मुंबई: बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन हे त्यांच्या चित्रपटांसोबतच विचारांसाठीही प्रसिद्ध आहेत. ते सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात आणि आपले विचार कविता, फोटोंद्वारे शेअर करत असतात. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बी आपली प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफबद्दल सुद्धा फॅन्सना माहिती देत असतात. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी जनता कर्फ्यू आणि अमावस्या संबंधी एक ट्विट केलंय. मात्र या ट्विटनंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.

या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी एक मॅसेज लिहिलाय, जो अनेक व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये पसरलेला आहे. यात जनता कर्फ्यू आणि अमावस्येचा संबंध जोडला गेला आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत सल्ला दिलाय: २२ मार्च संध्याकाळी ५ वाजता, अमावस्या, महिन्यातील सर्वात अंधार असणारा दिवस, जेव्हा व्हायरस, बॅक्टेरिया आणि वाईट शक्ती अधिक अॅक्टिव्ह असतात. टाळी वाजवणं, शंख वाजवल्यानं व्हायरसची शक्ती कमी होते किंवा संपते. चंद्र नवीन नक्षत्रात ‘रेवती’ नक्षत्रात जात आहे. एकूण स्पंदनं ब्लड सर्कुलेशन चांगलं करतात.

त्यांच्या या ट्विटचा अर्थ असा आहे की, २२ मार्चला महिन्यातील सर्वाधिक अंध:कारमय रात्र म्हणजे अमावस्या असल्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा प्रभाव अधिक होता. ज्यावर टाळी वाजवून आणि शंखनाद करून व्हायरसची शक्ती कमी करण्यासाठी कंपन निर्माण केले गेले. ट्वीट व्हायरल होताच बिग बींना ट्रोल केलं जावू लागलं. काही यूजर्सनी त्यांनी ‘चुकीची माहिती’ न पसरविण्याची अपील केलंय तर काही यूजर्सनी २२ मार्चला अमावस्या नव्हती, हे स्पष्ट केलंय. इथं पाहा काही ट्विट्स...

आपल्याला माहितीच आहे कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्चला ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं होतं. तसंच संध्याकाळी ५ वाजता ५ मिनीटं आपल्या घरातील गॅलरी, खिडकीमध्ये उभं राहून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यासाठी टाळ्या वाजवून, ताटल्या वाजवून, घंटानाद आणि शंखनाद करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार जनतेनं याला उत्तम प्रतिसाद देत संध्याकाळी ५ वाजता डॉक्टर्स, नर्स, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. अमिताभ बच्चन यांनी सुद्धा सहकुटुंब आपल्या टेरेसवर येऊन टाळ्या वाजवल्या आणि घंटानाद केला होता. त्याबाबतीतच अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं होतं.

दरम्यान, या ट्रोलिंग आणि वादानंतर बिग बींनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून ते ट्विट डिलिट केलेलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...