TanhaJi Tax Free: उत्तरप्रदेशात टॅक्स फ्री झाला अजय देवगणचा चित्रपट ‘तानाजी’

बी टाऊन
Updated Jan 13, 2020 | 17:13 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Tanhaji Tax free in Uttar Pradesh: उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं अजय देवगणचा चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ राज्यात टॅक्स फ्री केला आहे. यानंतर आता चित्रपटाचे तिकीट दर खूप स्वस्त होणार आहेत.

Tanhaji Tax free in Uttar Pradesh
उत्तरप्रदेशात टॅक्स फ्री झाला अजय देवगणचा चित्रपट ‘तानाजी’  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • उत्तरप्रदेश सरकारनं अजय देवगणचा चित्रपट तान्हाजी: द अनसंग वॉरियर केला टॅक्स फ्री
  • टॅक्स फ्री केल्यानं चित्रपटाचे तिकीट दर ३० ते ६० रुपयांनी होतील स्वस्त
  • देशात सर्वाधिक उत्तरप्रदेशातील स्क्रीनवर रिलीज झालाय चित्रपट

Tanhaji Tax free in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ला राज्यात टॅक्स फ्री केलंय. यानंतर आता चित्रपटाचे तिकीट दर स्वस्त होणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालाय. तीन दिवसांमध्येच चित्रपटानं बंपर कमाई केलीय. आतापर्यंत चित्रपटानं एकूण ६० कोटींहून अधिक रूपयांची कमाई केलीय.

उत्तरप्रदेशात तानाजी चित्रपटाला टॅक्स फ्री केल्यानंतर याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर पडण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशात आता चित्रपटाचं तिकीट आता ३० ते ६० रुपयांनी स्वस्त होईल. यानंतर प्रेक्षकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट भारतात एकूण ३८८० स्क्रीन्सवर रिलीज झालाय. यात उत्तर प्रदेशच्या स्क्रीनची संख्या खूप जास्त आहे.

 

 

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा दाखवली आहे. चित्रपटात अभिनेता अजय देवगणनं तानाजी मालुसरेंची भूमिका साकारलीय. तर अभिनेता सैफ अली खान मुघलांचा सरदार उदयभानच्या भूमिकेत आहे. चित्रपटात अभिनेत्री काजोलनंही भूमिका साकारलीय. काजोल चित्रपटात सावित्री मालुसरेंच्या भूमिकेत आहे.

 

 

हा चित्रपट अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’ या चित्रपटासोबत रिलीज झाला होता. मात्र छपाकच्या तुलनेत बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत तानाजी खूप सरस ठरला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोन दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात पोहोचली होती. यावरून चांगलंच राजकारण तापलं आणि याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होताना दिसतोय. दरम्यान, काँग्रेसचं सरकार असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान इथं ‘छपाक’ हा चित्रपट टॅक्स फ्री केला गेला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी