Uunchai Vs Yashoda box office collection: समंथाच्या 'यशोदाने' बिग बींच्या 'ऊंचाई'ला चारली धूळ, पहिल्या दिवशी एवढीच कमाई

बी टाऊन
Updated Nov 12, 2022 | 20:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Uunchai Vs Yashoda box office collection: 11 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर 3 सिनेमा ( box office release) रिलीज झाले. या तिन्ही सिनेमांमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार आहेत. या तिन्ही सिनेमांपैकी कोणाचं पारडं वरचढ ठरलं ते पाहू.

Uunchai Yashoda box office collection of first day
बॉक्स ऑफिस रिपोर्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले बिग बॅनर सिनेमा
  • दिग्गज कलाकारांची मांदियाळी
  • समंथा रुथ प्रभूच्या सिनेमाचे चांगली कामगिरी

Uunchai Vs Yashoda box office collection: 11 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी तीन सिनेमा रिलीज (box office release)  झाले आहेत. अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan), अनुपम खेर (Anupam Kher) आणि बोमन इराणी (Boman Irani) स्टारर ऊंचाई (Uunchai), समंथा रुथ प्रभूचा यशोदा (Yashoda) आणि हॉलिवूड सिनेमा ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर (Black Panther: Wakanda Forever) रिलीज झाले आहेत. या तिन्ही सिनेमांबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे. (Uunchai Yashoda box office collection of first day)

अमिताभ बच्चन यांच्या 'ऊंचाई' या सिनेमाने पहिल्याच दिवशी 1.65 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमावा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात चार मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही बिग बींच्या दमदार अभिनयाचे कौतुक प्रेक्षक करताना दिसत आहेत. कोरोननंतर  बिग बींच्या या सिनेमाने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. अमिताभ बच्चन यांच्या झुंड या सिनेमाने 1.50 कोटींची ओपनिंग केली होती. अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर, डॅनी डेन्झोंगपा आणि नीना गुप्ता, परिणिती चोप्रा प्रमुख भूमिकेत आहेत.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा रुथ प्रभूचा सिनेमा यशोदा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या सिनेमाने साऊथमध्ये 3 कोटींचा व्यवसाय केला असून जगभरात 4 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेम 5 भाषांमध्ये रिलीज झाला आहे. 'यशोदा' ही एक क्रिमीनल ड्रामा फिल्म आहे जी सरोगसी घोटाळ्याशी संबंधित आहे. समंथाच्या यशोदा सिनेमाने नागार्जुनच्या घोस्ट आणि नागा चैतन्यच्या थँकू सिनेमापेक्षा चांगले कलेक्शन केले आहे. 


ब्लॅक पँथर या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये जबरदस्त चर्चा आहे. मार्वलने या सिनेमाच्या माध्यमातून दिवंगत अभिनेते चॅडविक बोसमन यांना श्रद्धांजली दिल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 10 ते 11 कोटींचा व्यवसाय केला आहे. हा सिनेमा हिंदीतही चांगली कमाई करेल अशी निर्मात्यांना आशा आहे.  

मात्र, या सगळ्यात समंथाचा यशोदा सिनेमा वरचढ ठरतोय. सिनेमाची पहिल्या दिवशीची कमाई पाहता या सिनेमाने बिग बींच्या ऊंचाई सिनेमाला मागे टाकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसं पाहता सिनेमाच्या रिलीजच्या दिवशीच यशोदा सोशल मीडियावर लिक झाला होता. त्यामुळे थिएटरपर्यंत प्रेक्षकांना खेचून आणण्यात सिनेमा यशस्वी होणार का अशी शंका निर्मात्यांना होती. मात्र, पहिल्या दिवशीचं चित्र पाहता सिनेमा यापुढेही चांगली कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी