Birthday Spacial: हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 'या' अभिनेत्रीचं फळफळलं नशीब? असा खडतर होता तिचा बॉलिवूडचा प्रवास

बी टाऊन
Updated Aug 23, 2022 | 14:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vaani Kapoor Birthday Spacial: वाणी कपूरने (Vani Kapoor) बॉलीवूडमध्ये अभिनयाने स्वत:ला सिद्ध केलेलं आहे. या अभिनेत्रीचा बॉलिवूडशी कोणताही संबंध नव्हता, त्यानंतरही तिने अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. वाणी कपूरचा (Vani Kapoor Birthday) चित्रपट प्रवास इतका सोपा नव्हता. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वाणीला हिंदी चित्रपटांमध्ये काम कसे मिळाले ते जाणून घेऊया.

Vani Kapoor Birthday special her journey from Delhi to Bollywood
असा आहे 'या'अभिनेत्रीचा बॉलिवूडपर्यंतचा खडतर प्रवास  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वाणी कपूरचा 34 वा वाढदिवस
  • बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी हॉटेलमध्ये काम करत होती वाणी कपूर
  • टूरिझममध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण

Vaani Kapoor Birthday Spacial: वाणी कपूरने (Vani Kapoor) 2013 साली शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आजच्या काळात वाणी कपूरला कोणत्याही ओळखीची गरज नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करून नाव कमावण्याची करोडो लोकांची इच्छा आहे. पण इंडस्ट्रीत ओळख मोजक्याच लोकांना मिळते.
या मोजक्या लोकांमध्ये वाणी कपूरचाही समावेश आहे. वाणी कपूरचा बॉलिवूड (Vani kapoor Bollywood entry ) प्रवास इतका सोपा नव्हता. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अभिनेत्री हॉटेलमध्ये काम करायची. तिच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त तिच्या चित्रपट प्रवासाविषयी जाणून घेऊया, दिल्ली ते बॉलिवूडच्या या झगमगत्या दुनियेत वाणी कशी पोहोचली ते पाहूया. (Vani Kapoor Birthday special her journey from Delhi to Bollywood)


अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत पदार्पणातील सिनेमा केला होता

दिल्ली गर्ल वाणी कपूरने आपल्या करिअरची सुरुवात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत केली होती. पहिला चित्रपट केल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही. सध्याच्या घडीला तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या स्टार्ससोबत काम केले आहे.

अधिक वाचा : कृष्णा अभिषेकने 'का' सोडला The Kapil Sharma Show?

वाणी कपूर हॉटेलमध्ये काम करत होती

वाणी कपूरने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. टूरिझममध्ये तिने पदवी घेतली आहे. यानंतर तिने जयपूरच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये इंटर्नशिप केली
तर आयटीसी हॉटेलमध्ये केले. एकदा हॉटेलमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, त्यावेळी वाणी कपूरने सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर वाणीने सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला.


वाणीचे वडील मॉडेलिंगच्याविरोधात होते. 

वाणी कपूरने हॉटेलची नोकरी सोडली आणि मॉडेलिंगला सुरुवात केली. सुरुवातीला तिच्या वडिलांना तिचे मॉडेलिंग अजिबात आवडले नाही. पण आईने तिला पूर्ण पाठिंबा दिला. यानंतर तिने अनेक मोठ्या आणि लोकप्रिय डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे. फॅशन शोमधूनच वाणी कपूरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. 

अधिक वाचा :  भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा गोव्यात मृत्यू

वाणीचे वडील बिझनेसमन आहेत


वाणी कपूरचा जन्म 23 ऑगस्ट 1988 रोजी दिल्लीत झाला. तिच्या वडिलांचा दिल्लीत फर्निचर निर्यातीचा व्यवसाय आहे. तर तिची आई मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. वाणी कपूरने तिचे शिक्षण दिल्लीतूनच केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी