वरुण धवन आणि नताशा यांच्या लग्नासाठी खास सजावट, पाहा फोटो 

Varun Dhawan Natasha Dalal mandap: वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाच्या सजावट आणि मंडप याचे फोटो आता समोर आले आहेत. पाहा ही सजावट नेमकी कशी आहे. 

mandap_varun
वरुण धवन आणि नताशा यांच्या लग्नासाठी खास सजावट, पाहा फोटो   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • वरुण धवन आणि नताशा दलाल यांचे लग्न अलिबाग येथे संपन्न
  • लग्नासाठी विशिष्ठ फुलांनी करण्यात आली सजावट
  • लग्नाचे फोटो लीक होऊ नयेत म्हणून घेण्यात आलीए विशेष काळजी

अलिबाग: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्न समारंभांचे फोटो आता व्हायरल होऊ लागले आहेत. पण अद्यापही वर आणि वधू यांची एकही झलक मिळू शकलेली नाही. पण लग्नाच्या ठिकाणी केलेली सजावट व मंडप याचे फोटो आता समोर आले आहेत. लग्नाच्या ठिकाणाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या लग्नासाठी एका सुंदर गुलाबी थीमवर सजावट करण्यात आली आहे.

या ठिकाणी गुलाबी आणि पांढर्‍या फुलांनी सजावट केलेली आहे. एका मोठ्या हवेलीतील पूलसाइड भागात मंडप सजविला ​​गेला आहे. जिथे वरुण धवन आणि नताशा दलाल सात फेरे घेतील आणि त्यांचे विवाहित जीवन सुरू करतील.

रिपोर्ट्सनुसार वरुण आणि नताशाच्या लग्नाचा कार्यक्रमही सुरू झाला आहे. दुपारी जोडप्याचे लग्न होणार आहे. शनिवारी सायंकाळी संगीत सेरेमनी आयोजित करण्यात आली होती. त्यादिवशी वरुण धवनची बॅचलर पार्टी होती ज्यात त्याचे बरेच मित्र उपस्थित होते.

गोपनीयता ठेवण्यासाठी वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी अतिथींना त्यांच्या परवानगीशिवाय लग्नाचे फोटो लीक करू नका असे सांगितले आहे. तसेच लग्नस्थळी फोन आणून नियमांचे उल्लंघन करण्याची परवानगी नाही. प्रत्येकाच्या फोनवर स्टिकर पेस्ट केले गेले आहेत.

तसेच कोरोना साथीच्या आजारामुळे, एक रॅपिड कोविड चाचणी देखील येथे केली जाणार आहे. जेणेकरून कार्यक्रमास भेट देणार्‍या प्रत्येक व्यक्तीची चाचणी केली येईल.

वरुण आणि नताशाचे लग्न नक्कीच बॉलिवूड विश्वात चर्चेचा विषय बनले आहे. चाहते आणि इतर अनेक जण सोशल मीडियावरील प्रत्येकजण या जोडप्याच्या लग्नाच्या पहिल्या फोटोची वाट पाहत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी